China removes 200 tanks in two days, empties disputed Pangong Lake area: report

दोन दिवसांत चीनने हटवले 200 रणगाडे, वेगाने रिकामा होतोय वादग्रस्त पैंगोंग लेकचा परिसर : रिपोर्ट

लडाखमधील एलएसीवरून भारत आणि चीनमधील तणाव आता जवळपास नऊ महिन्यांनंतर कमी होऊ लागला आहे. भारताशी झालेल्या करारानंतर चीनने दोनच दिवसांत 200 हून अधिक रणगाडे माघारी पाठवले आहेत. येत्या 15 दिवसांत वादग्रस्त पैंगोंग लेकचा परिसर चीन पूर्णपणे रिकामा करण्याची शक्यता आहे. यानंतर भारत सरकार इतर परिसरातून चीनला हटण्यास सांगणार आहे. China removes 200 tanks in two days, empties disputed Pangong Lake area: report


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लडाखमधील एलएसीवरून भारत आणि चीनमधील तणाव आता जवळपास नऊ महिन्यांनंतर कमी होऊ लागला आहे. भारताशी झालेल्या करारानंतर चीनने दोनच दिवसांत 200 हून अधिक रणगाडे माघारी पाठवले आहेत. येत्या 15 दिवसांत वादग्रस्त पैंगोंग लेकचा परिसर चीन पूर्णपणे रिकामा करण्याची शक्यता आहे. यानंतर भारत सरकार इतर परिसरातून चीनला हटण्यास सांगणार आहे.

गुरुवारी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, चिनी सैन्याने फिंगर आठमधून माघार घेण्यास सहमती दर्शविली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, भारतीय आणि चिनी सैन्यांची सुरुवातीचे विघटन केवळ पैंगोंग लेकपुरते मर्यादित आहे आणि दोन्ही सैन्यांना त्यांच्या मूळ तैनातीस्थानी परत जाण्यास आणखी दोन आठवडे लागू शकतात.एकदा ही प्रक्रिया संपल्यानंतर 48 तासांच्या आत कॉर्प्स कमांडर-स्तरीय बैठक होईल. यात हॉट स्प्रिंग्ज, गोगरा आणि 900 चौरस किलोमीटरच्या डेपसांग मैदानासारख्या इतर स्थानांवर चर्चा केली जाईल. संरक्षणमंत्री राज्यसभेत म्हणाले, ‘पूर्व लडाखमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेवर(एलएसी) काही इतर ठिकाणी तैनात आणि गस्त घालण्याबाबत अजूनही काही प्रलंबित प्रकरणे आहेत. आगामी बैठकांत चीनशी यावर चर्चा होईल.’

China removes 200 tanks in two days, empties disputed Pangong Lake area: report

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*