चीनने मागितला खर्च तर बांग्लादेशने भारतकडून केली कोरोना लसीची मागणी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली: भारताने कोरोना लसीचे कोट्यावधी डोस उदारपणे आपल्या शेजारच्या देशांना विनामूल्य पाठविले आहेत. परंतु स्वत: ला आशियातील सर्वात मोठी शक्ती मानणारा चीन आपल्या मित्रांना क्लिनिकल चाचण्यांचा खर्च देखील मागत आहे . चिनने कोरोनाव्हॅक लसीच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह असतांना निर्भयपणे सार्क देशातील सिनोव्हॅक उत्पादित औषधाच्या क्लिनिकल चाचण्यांचा खर्च मागीतला आहे . यामुळे बांग्लादेशने चीनच्या लसीऐवजी भारताच्या कोविशिल्डला प्राधान्य देत भारताकडे लसीची मागणी केली आहे.China demanded co-vaccine while Bangladesh demanded corona vaccine

भारताने कोरोना लसीचे २० लाख डोस केवळ भेट म्हणून बांग्लादेशात पाठविल्या आहेत. याशिवाय कराराच्या अंतर्गत भारत बांग्लादेशला कोरोना लसीचे ३ कोटी डोस देखील पाठवेल. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये बनविलेल्या कोविशिल्ड लसी भारताने बांग्लादेशला पाठविल्या आहेत.१७ डिसेंबर २०२० रोजी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती . त्यावेळी पंतप्रधान मोदींनी बांगलादेशला आश्वासन दिले होते की भारत प्रत्येक गरजेच्या वेळी त्यांच्याबरोबर आहे. कोविड लस, लस वितरण, सह-उत्पादन आणि बांग्लादेशला वितरण या सर्व बाबतीत आता दोन्ही देशांमध्ये सहकार्य सुरू आहे.

श्रीलंका आणि नेपाळ यांनीही चीनच्या कोरोना लसीबाबत शंका व्यक्त केली. त्याचबरोबर भारतीय लसीची मागणी छोट्या देशांमध्येही वाढत आहे.

ढाका येथील भारतीय राजदूतांच्या म्हणण्यानुसार, २० ऑक्टोबर २०२० च्या सुमारास चीनला कोरोनाव्हॅकच्या पुरवठ्याबाबत शेख हसीना सरकारबरोबर करार करायचा होता. करारामधील एक अट अशी होती की क्लिनिकल चाचण्यांचा खर्च ढाकाला देखील वाटून घ्यायचा होता. ढाकाने अट मान्य करण्यास नकार दिला. चीनकडून असे सांगितले जात होते की जो कोणी सायनोव्हॅक कंपनीकडून लस विकत घेईल त्यांना खर्च द्यावा लागेल आणि यासाठी बांग्लादेश त्याला अपवाद नाही .

यानंतर ढाकाने चीनकडे पाठ फिरविली आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बनवलेल्या कोरोना लसीच्या पुरवठ्यासाठी मोदी सरकारशी करार केला आहे . ३ कोटी पैकी ३ लाख लसी आतापर्यंत भारताने बांग्लादेशला पाठविल्या आहेत.

भारताने आतापर्यंत सात शेजारच्या देशांना कोरोना लसीचे ५० लाख डोस दिले आहेत. २० जानेवारी रोजी भारताने कोरोनाची लस प्रथम भूतानला पाठविली होती.

China demanded co-vaccine while Bangladesh demanded corona vaccine

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती