बीबीसीला चीनचा झटका, प्रक्षेपण करण्यास घातली बंदी

ब्रिटीश टेलीव्हिजन चॅनल बीबीसीला चीनमध्ये प्रक्षेपण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. चीनच्या राष्ट्रीय रेडीओ आणि टेलीव्हिजन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमध्ये चीनच्या राष्ट्रीय चॅनलचे लायसन्स रद्द करण्यात आल्यानंतर आठवडाभरातच चीनने त्याला प्रत्युत्तर दिले आहे.  China bans BBC from airing


वृत्तसंस्था

लंडन : ब्रिटीश टेलीव्हिजन चॅनल बीबीसीला चीनमध्ये प्रक्षेपण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. चीनच्या राष्ट्रीय रेडीओ आणि टेलीव्हिजन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमध्ये चीनच्या राष्ट्रीय चॅनलचे लायसन्स रद्द करण्यात आल्यानंतर आठवडाभरातच चीनने त्याला प्रत्युत्तर दिले आहे.याबाबत चीनने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की कोणतीही बातमी ही तथ्यावर आधारित आणि निस्पृह असावी हे तत्वच बीबीसीने मोडले आहे. त्याचबरोबर चीनच्या राष्ट्रीय हिताला बाधा येईल अशा प्रकारचे वृत्तांकन बीबीसीकडून करण्यात आले आहे. परदेशी वाहिनीला परवान्यासाठी आवश्यक अटींचे पालन केले जात नसल्याने बीबीसीचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

वास्तविक चीनमध्ये पाहिल्या जाणाऱ्या चॅनलच्या बुकेमध्ये बीबीसीचा समावेश नसतो. परंतु, काही हॉटेल आणि घरांमध्ये हे पाहिले जाते. रॉयटरच्या दोन पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार बीबीसी चॅनल लावल्यावर स्क्रिन ब्लॅंक दिसत आहे. बीबीसीने याबाबत म्हटले आहे की हा अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. त्यामुळे बीबीसीने याबाबत कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. बीबीसी हे जगातील सर्वाधिक विश्वासार्ह आंतरराष्ट्रीय चॅनल आहे. बीबीसीवरील वृत्ते ही निस्पृह असतात. चायना ग्लोबल टेलीव्हिजन नेटवर्कचा परवाना इंग्लंडच्या ऑफकॉम या संस्थेने रद्द केला होता. त्यानंतर हा चीनने हा निर्णय घेतला आहे.

China bans BBC from airing

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*