चीनशी संघर्षात जखमी भारतीय सैनिकांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विचारपूस ; शूर वीरांच्या मातांनाही वंदन

वृत्तसंस्था

लेह : भारत – चीन हिंसक संघर्षात जखमी झालेल्या भारतीय सैनिकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन आपुलकीने विचारपूस केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अचानक लेह – लडाखला भेट दिली. त्यांनी गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या जवानांची विचारपूस केली. लेहमध्ये आज अचानक जाऊन मोदी यांनी जवानांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.

लडाखमधल्या जवानांचे शौर्य हे हिमालय पर्वतापेक्षा मोठे आहे, असा गौरव मोदींनी केला. त्यानंतर त्यांनी जखमी जवानांची मोदी यांनी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. या वेळी त्यांच्या समवेत सैन्य दलांचे संयुक्त प्रमुख जनरल बिपिन रावत, लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे देखील होते.

आपला देश कोणत्याही जागतिक संकटापुढे झुकलेला नाही, झुकणार नाही. आज मला तुमचा आणि तुमच्या मातांचा अभिमान आहे ज्यांनी तुमच्यासारख्या शूर वीरांना जन्म दिला असे गौरवोद्गार मोदींनी काढले. सगळे लवकर बरे व्हा, अशा शुभेच्छाही मोदींनी जवानांना दिल्या.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*