आईने पंजाबी ड्रेस घातल्यामुळे नागठाणेत मुलाची आत्महत्या

वृत्तसंस्था

सातारा : नागठाणे (ता. सातारा) येथील बाजारमळा परिसरातील एका मुलाने आईला पंजाबी ड्रेस घालू नको, तू साडीस नेस, असे सांगितले मात्र, तिने पंजाबी ड्रेस घातल्यामुळे रागाच्या भरात मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. २३ ) सायंकाळी घडली. Child commits suicide in Nagthana as mother wears Punjabi dressशेरु शौकत भोसले (वय १६) असे त्या मुलाचे नाव आहे. नागठाणेतील बाजारमाळ परिसरात भोसले कुटुंबीय रहात आहे. मंगळवारी सायंकाळी शेरूची आई ही घरात होती. त्यावेळी तिने पंजाबी ड्रेस परिधान केला होता. यावेळी शेरुने ‘तू ड्रेस का घातला. साडी घाल,’ असे सांगितले. मात्र, तिने पंजाबी ड्रेस तसाच ठेवला. याचा शेरु याला राग आला.

रागाच्या भरात तो घरातून निघून गेला. याची माहिती आईने घरातल्यांना दिल्यानंतर शेरुचा शोध सुरु झाला. शेरु याने घरापासून जवळच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले.

Child commits suicide in Nagthana as mother wears Punjabi dress

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*