ठाकरे सरकार पाडून दाखविण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा, पण कोणाला??

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार पाडून दाखवा, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताच्या कार्यक्रमात दिला खरा…पण नेमका कोणाला??Chief Minister warns to overthrow Thackeray government

याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सरकार पाडायची घाई कोणाला झाली आहे?? विरोधी पक्षांना… तसे तर अजिबात दिसत नाही. किंबहुना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर म्हटलेय, की सरकार पाडण्याची भाजपला अजिबात घाई नाही. स्वतःच्या वजनाने आणि अंतर्गत मतभेदातून सरकार पडेल.त्यामुळे भाजप तरी सध्या ठाकरे – पवार सरकार पाडायच्या घाईत नाही… मग मुख्यमंत्र्यांनी सरकार पाडून तर दाखवा, हा इशारा नेमका दिलाय तरी कुणाला… कोण या सरकारमध्ये अस्वस्थ आहे… कुणाचे काय आणि कुठे दुखते आहे… कुणाला या सरकारचे काय खुपते आहे… याची या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे.

मध्यंतरी काँग्रेसच्या मंत्र्यांनी ठाकरे – पवार सरकारविरोधातील अंतर्गत तक्रारींचा पाढा थेट सोनिया गांधींपुढे वाचला. त्यांच्यातली अस्वस्थता जोराने फुटू पाहात आहे का… ती अस्वस्थता बाहेर फुटून आपल्या खुर्चीला धोका उत्पन्न होऊ नये म्हणून तर ऑफेन्सिव्ह डिफेन्स पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सरकार पाडून तर दाखवा, असे विधान केले नसेल ना… की आणखी काही वेगळ्या कारणाने मुख्यमंत्र्यांनी सरकार पाडून दाखविण्याचा इशारा दिलाय…

मध्यंतरी भाजप – राष्ट्रवादीत काही खिचडी शिजत असल्याच्या बातम्या आल्या. देवेंद्र फडणवीसांची नागपूरातली ऑफ द रेकॉर्ड मुलाखत बाहेर आली. तसेही मुख्यमंत्री सिल्वर ओकच्या छायेतून बाहेर येऊन कारभार पाहायला लागलेत. सिल्वर ओकची जुनी धाकाची छाप ठाकरे सरकारवर राहिलेली दिसत नाही. मुंबईतील शेतकरी आंदोलनाकडे स्वतः मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवलीच. पण आदित्यलाही तिकडे जाऊ दिले नाही. त्यामुळे शरद पवार हे एकटेच मोठे नेते कम्युनिस्टांच्या लाल झेंड्यांच्या मोर्चात दिसले. शिवसेनेचे भगवे तिकडे दिसलेच नाहीत.

त्यामुळे एकूणच शिवसेना नेतृत्त्व पवारांना फारसे विचारत नसल्याचे जे चित्र निर्माण झाले त्यातून ते सध्या या सरकारपासून स्वतःची सुटका करवून घेऊ इच्छित नाही ना… अशी शंका मुख्यमंत्र्यांना आली… म्हणून त्यांनी हलवून खुंटा बळकट करण्यासाठी सरकार पाडून दाखवायचा इशारा दिलाय का… ही चर्चा देखील रंगली आहे.

Chief Minister warns to overthrow Thackeray government

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*