Chief Minister Thackeray refuses permission to Governor Koshyari from using aircraft!

मुख्यमंत्री ठाकरेंची राज्यपाल कोश्यारींना सरकारी विमान वापरण्यास मनाई!

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्र सरकार यांच्यातील वाद आता अधिक गडद होताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारींना सरकारी विमान वापरण्यास मनाई केल्याचे सांगण्यात येत आहे. Chief Minister Thackeray refuses permission to Governor Koshyari from using aircraft!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्र सरकार यांच्यातील वाद आता अधिक गडद होताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारींना सरकारी विमान वापरण्यास मनाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यपाल कोश्यारींना आयएएस अकादमीच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहण्यासाठी मसुरी येथे जायचे होते. यासाठी ते मुंबई विमानतळावर गेले असता त्यांना सरकारी विमान वापरण्यास मुख्यमंत्र्यांची परवानगी नसल्याचे सांगण्यात आले.

फ्लाइटमध्ये बसल्यानंतर राज्यपाल कोश्यारींना बाहेर पडावे लागले. यानंतर राज्यपाल कोश्यारींनी खासगी कंपनीच्या विमानाने मसुरीकडे प्रयाण केले. राज्यपालांनी स्पाइसजेटच्या विमानाची बुकिंग केली आहे.

Chief Minister Thackeray refuses permission to Governor Koshyari from using aircraft!

Chief Minister Thackeray refuses permission to Governor Koshyari from using aircraft!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*