अबब… मुख्यमंत्री ठाकरेंकडे तब्बल १९ बंगले; प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याप्रकरणी ;सोमय्यांची निवडणूक ;आयोगांकडे तक्रार


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे १९ बंगले आहेत. त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती लपवली असल्याचा आरोप करत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. Chief Minister Thackeray has 19 bungalows

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची अलिबाग येथे 5 कोटीची संपत्ती आहे. त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी लपवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. निवडणूक आयोगाचे महाराष्ट्र प्रतिनिधी बलदेव सिंह यांच्याकडे सोमय्या यांनी ही तक्रार केली आहे.सोमय्या म्हणाले, आम्ही केलेली तक्रार निवडणूक आयोगाच्या दिल्ली येथील मुख्यालयात पाठवण्याचे आश्वासन बलदेव सिंह यांनी दिले आहे.

मुख्यमंत्र्यांचे 19 बंगले, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीने जप्त केलेली 78 एकर जमीन, संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची भागिदारी असलेली महाकाली गुंफेची जमीन बिल्डराच्या घशात घालण्याचा डाव, मुंबई महापालिकेने दहिसर येथील 2.55 कोटीचा भूखंड बिल्डरला 349 कोटीला दिला

Chief Minister Thackeray has 19 bungalows

पाच हजार बेडवाल्या 12 हजार कोटीच्या रुग्णालयाच्या घोटाळ्याचे पुरावे मिळाले असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था