पाकिस्तानात पाडलेले हिंदू मंदिर पुन्हा बांधणार, खैबर पख्तुनख्वाच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात पाडण्यात आलेले हिंदू मंदिर पुन्हा बांधून देण्याची घोषणा मुख्यमंत्री महमूद खान यांनी केली. Chief Minister of Khyber Pakhtunkhwa announces to rebuild Hindu temple demolished in Pakistan


विशेष प्रतिनिधी

पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात पाडण्यात आलेले हिंदू मंदिर पुन्हा बांधून देण्याची घोषणा मुख्यमंत्री महमूद खान यांनी केली. भारत आणि हिंदुत्ववादी संघटनांची आक्रमक भूमिका आणि पाकिस्तानातील मानव हक्क कार्यकर्ते , अल्पसंख्याक हिंदू समुदायाने मंदिर जमीनदोस्त कृत्याचा तीव्र निषेध करून मुख्यमंत्री आणि जगाचे लक्ष्य वेधले होते.



बुधवारी कट्टर इस्लामीवाद्यांनी हिंदूंचे जुने मंदिर जमीनदोस्त केले होते.खैबर पख्तुनख्वा प्रांतातील करक जिल्ह्यातील टेरी गावात हे मंदिर होते. या मंदिरात हिंदू धार्मिक नेत्याची समाधी होती. या प्रकरणी 26 जणांना ताब्यात घेतले आहे.

Chief Minister of Khyber Pakhtunkhwa announces to rebuild Hindu temple demolished in Pakistan

या जातीयवादी आणि धर्माध कृत्याचा निषेध झाल्यावर सरकार जागे झाले. हिंदूंचे मंदिर पाडून टाकल्यानंतर भारतात तीव्र संतापाची लाट उसळली. उत्तरप्रदेशातील अलिगढमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत पाकिस्तानचा निषेध केला होता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*