मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही भंडारा आगप्रकरणी दोषींवर कारवाई नाही, भाजपाकडून भंडारा जिल्हा बंदची हाक


भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 8 जानेवारीच्या मध्यरात्री अतिदक्षता विभागात आग लागून 10 निष्पाप चिमुकल्यांचा बळी गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी भंडाऱ्यात येऊन पाहणी केली मात्र तरीही दोषींवर कारवाई न झाल्यानं भाजपकडून सोमवारी भंडारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. chief Minister, no action has been taken against the culprits in the Bhandara fire case


विशेष प्रतिनिधी

भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 8 जानेवारीच्या मध्यरात्री अतिदक्षता विभागात आग लागून 10 निष्पाप चिमुकल्यांचा बळी गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी भंडाऱ्यात येऊन पाहणी केली मात्र तरीही दोषींवर कारवाई न झाल्यानं भाजपकडून सोमवारी भंडारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.


भंडारा येथील आगीत होरपळलेल्या कोवळ्या जीवांचे सोयर-सुतक नक्की कोणाला?


भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र सरकारचे अनेक मंत्री येऊन गेले व आज राज्याचे मुख्यमंत्री भंडारा जिल्ह्यात येऊन सुद्धा दोषींवर कारवाई झाली नसल्याने जिल्हा भाजपाच्या वतीने उद्या भंडारा बंद ठेवण्यात येणार आहे. हे प्रकरण लवकरात लवकर तपास करुन दोषी अधिकारी आणि संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी खासदार मेंढे यांनी केली आहे.

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात येईल, कुठलीही कसर ठेवण्यात येणार नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा येथे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी भंडारा येथील भोजापूर येथे जाऊन विश्वनाथ आणि दीपा बेहेरे या दाम्पत्याची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी भंडारा जिल्हा रुग्णालयाची देखील पाहणी केली.

chief Minister, no action has been taken against the culprits in the Bhandara fire case

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या सर्व रुग्णालयाच्या फायर एन्ड सेफ्टी ऑडिटचे आदेश दिले आहे, जरी ऑडिट झाले असले तरी पुन्हा करायला लावू, असंही ते म्हणाले. या घटनेवरुन थेट राज्याच्या आरोग्याच्या स्थितीवर जाऊ नका. आम्ही राज्याची जबाबदारी घेतली आहे, असंही ते म्हणाले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था