वीज तोडली तर जागेवरच सोक्षमोक्ष, संघर्ष अटळ, खासदार छत्रपती उदयनराजेंचा इशारा


त्या त्या वेळी लावताना संघर्ष अटळ ठरेल असा इशारा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.Chhatrapati Udayan Raje’s warning if the power is cut off, the struggle is inevitable


विशेष प्रतिनिधी

सातारा : कोरोनासारख्या संसर्गजन्य जागतिक महामारीत जर वीजथकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई होणार असेल तर ते कदापि मान्य करता येणार नाही. अशावेळी आम्ही वीज ग्राहकांच्या बाजूने ठाम उभे राहणार आहोत.

तसेच अशा कारवाईत कोणा कोणाची वीज तोडली याचा आढावा घेऊन त्याबाबतचा जागेवरच सोक्ष मोक्ष, त्या त्या वेळी लावताना संघर्ष अटळ ठरेल असा इशारा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.


पवारांनी वडिलकीच्या नात्याने मराठा आरक्षणात लक्ष घालावे, अन्यथा…; उदयनराजेंचा इशारा


उदयनराजे म्हणाले, लॉकडाउन, अनलॉक प्रकाराचा सकारात्मक,नकारात्मक परिणाम सर्वसामान्य जनतेवर पडला आहे. बहुतांशी सर्वच क्षेत्रातील व्यावसायिक आणि मुख्यत्वेकरुन शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत, विद्यमान आधुनिक काळात वीज जोडणी अत्यावश्यक आहे. अशी वीज जोडणी, वीजबिल थकबाकीमुळे तोडण्याची कारवाई वीज वितरण कंपनीकडून केली जात आहे.

वीज कंपनीने आजपर्यंत ग्राहकाभिमुख सेवा देवून, तोडण्याऐवजी जोडण्याचे काम चांगले केलेले असताना असा प्रकार होत असेल तर ते निश्चितच वेदनादायी आहे. त्यामुळे थकबाकीबाबत टप्याटप्याने रक्कम भरण्याचा निर्णय घेऊन कंपनीने महामारीने त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा संघर्ष अटळ आहे.

दिल्लीसारख्या राज्यामध्ये वीजबिल काही युनिटपर्यंत पुर्णत: माफ आहे. तेथे ठराविक युनिटपर्यंत वीज मोफत पुरवली जाते. त्या राज्याचे प्रतियुनिट दर देखील खूप कमी आहेत असे सांगून उदयनराजे म्हणाले, देशात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ही निश्चितच अग्रेसर राहिली आहे.

कोरोना काळात देखील वीज कंपनीच्या कर्मचा-यांनी अखंड वीज पुरवठा करण्याचे वाखाणण्यासारखे काम केले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा देखील सुरळीत राहिला. महाराष्ट्राची वीजेच्या गरजेपैकी जवळजवळ निम्मी वीज सातारा जिल्हयात तयार होत आहे ही वस्तुस्थिती आहे. कोरोना महामारीने गेले संपूर्ण वर्षभर संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कौटुंबिक गरजा भागवताना जवळजवळ सर्वांचीच तारेवरची कसरत होत आहे. आज काल वीज पुरवठा अत्यावश्यक झाला आहे. कोरोनामुळे बहुतांशी शैक्षणिक कार्य आॅनलाईन चालू आहे. जर वीज पुरवठा नसेल तर त्या घरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार आहे.

सध्या शहरी भागासह, ग्रामीण भागातील सर्व कुटुंबातील बहुतांशी कामे ही वीज पुरवठ्यावर सुरु आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात वीज कंपनीने, वीज बिलांचे सुध्दा वाटप केलेले नव्हते. सदरची तीन चार महिन्यांची वीज बिले एकत्रितपणे कालांतराने दिल्याने ती भरताना, कौटुंबिक आर्थिक नियोजन बारगळलेले आहे. तसेच एकत्रित वीज बिल दिल्याने एकूण युनिट्सचा युनिट दर लागला गेल्याने,त्या युनिटसंख्येनुसार वीज दर आकारुन बीले दिली गेल्याची उदाहरणे आहेत.

यामध्ये वीज ग्राहकाचे दुहेरी नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत, थकीत वीज बिल टप्याटप्याने भरणेबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावा. याबाबत धोरणात्मक निर्णय मंडळाने घेतला पाहीजे.

कोरोना सारख्या संसर्गजन्य जागतिक महामारीत जर वीजथकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई होणार असेल तर ते कदापि मान्य करता येणार नाही. अशावेळी आम्ही वीज ग्राहकांच्या बाजूने ठाम उभे राहणार आहोत. तसेच अशा कारवाईत कोणा कोणाची वीज तोडली याचा आढावा घेऊन, त्याबाबतचा जागेवरच सोक्ष मोक्ष त्या त्या वेळी लावताना संघर्ष अटळ ठरेल.

Chhatrapati Udayan Raje’s warning if the power is cut off, the struggle is inevitable

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था