छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जय कार;स्फूर्ती गीतांच्या स्पर्धेचे भाजपतर्फे राज्यात आयोजन

वृत्तसंस्था

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांवरील स्फूर्ती गीतांची शिवगान ही स्पर्धा भाजपच्या सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित केली आहे.9फेब्रुवारीपासून स्पर्धेला प्रारंभ होत आहे.Chhatrapati Shivaji BJP organizes inspirational song competition in the state

19 फेब्रुवारीला शिवजयंती दिनी किल्ले अजिंक्यतारा येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा समारोप होणार आहे. स्पर्धेद्वारे राज्यभर शिवजागर होईल, अशी माहिती भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.राज्यात 40 ठिकाणी स्पर्धा होणार असून 15 हजार स्पर्धकांनी भाग घेतला आहे. वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन विभागात स्पर्धा होणार असून त्यात शिवाजी महारांजावरील ओव्या , पाळणा, पोवाडा आणि स्फूर्ती गीते सादर करता येणार आहेत.

Chhatrapati Shivaji BJP organizes inspirational song competition in the state

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*