पुरवठामंत्री छगन भुजबळांच्या जिल्ह्यात ऐन दिवाळीत मोफत धान्याची ओरड


  • भुजबळ मात्र निर्धास्त; नाशिककरांशी काही देणे घेणे नसल्याचा अविर्भाव

विशेष प्रतिनिधी

नाशिक : दिवाळी ऐन तोंडावर असताना स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या मोफतच्या धान्यापासून गोरगरिबांना वंचित राहण्याची वेळ आली आहे. सणासुदीमुळे लाभार्थ्यांच्या दुकानांत चकरा वाढल्या असतांना दुकानदारांनी मोफत धान्य आले नसल्याचे फलक दुकानाबाहेर झळकवले आहेत. अन्नपुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यातील ही स्थिती असून त्यांना याचे काही देणे घेणे नाही,अशा अविर्भावात भुजबळ सध्या वावरत आहेत. शहरातील वर्तमानपत्रांनी बातम्या देऊनही फारसा फरक पडलेला नाही. chhagan bhujbal news

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये,यासाठी सरकारकडून नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकेवरील हक्कांच्या धान्यांसह मोफत धान्य देणाऱ्या भरपूर घोषणा झाल्या. मात्र त्यांचे वाटप सरसकट न ठेवता आधी तहसिलदारांना अर्ज करून त्यानंतरच दुकानातून मोफत धान्य दिले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात अन्य काही नाही तर कमीत कमी पोटभर जेवण त्यामुळे मिळाले. नोव्हेंबरपर्यत मोफत धान्य मिळणार असल्याचे सरकारतर्फे घोषित करण्यात आले होते. प्रत्यक्षात ऑक्टोबरचे मोफतचे धान्यही स्वस्त धान्य दुकानात आलेले नाही. लाभार्थ्यांना त्यामुळे धान्य मिळाले नाही. दैनंदिन त्यांच्याकडून स्वस्त धान्य दुकानात चकरा मारून धान्य आले की नाही याची चौकशी सुरू आहे. काही नागरिक दुकानदारांशी वाद घालत आहेत.

chhagan bhujbal news

सणासुदीच्या तोंडावर फलक

मोफत धान्य घेऊन लाभार्थ्यांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासास कंटाळून शेवटी दुकानदारांनी दुकानाबाहेर फलक लावून मोफतचे धान्य आले नसल्याचे फलक लावले आहेत. दिवाळी अवघ्या दहा ते बारा दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा वेळी धान्याची खरी आवश्यकता होती पण सणासुदीच्या दिवसांतच मोफत धान्य मिळत नसल्याने लाभार्थ्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

शहरातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थ्यामध्ये बरेच लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. झोपडपट्टीमध्ये राहणारा मोठा वर्ग आहे तर दुसरीकडे लॉकडाऊनच्या परिणामातून अजूनही बरेच कुटुंबे सावरली नाहीत. अशा कुटूंबावर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. chhagan bhujbal news

पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या गोरगरिब नागरिकांनी तक्रारही केली,पण त्याचे पुढे काही झाले नसल्याचे समजते. भुजबळांना याचे सोयरसुतक नसल्याचे दिसते. प्रशासनाकडून याबाबत पावले उचलून सणासुदीत तरी धान्य उपलब्ध होईल,अशी मागणी नागरिकांना केली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था