‘रोखठोक’साठी चंद्रकांत पाटील यांनी दिले मुद्दे; ‘हे लिहून दाखवाच..’ म्हणत संजय राऊत यांना आव्हान


शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपवर सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरून आव्हान दिलंय. काही मुद्दे देत रोखठोक सदरातून हे लिहिण्याची हिंमत दाखवा असे म्हटले आहे.


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपवर सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरून आव्हान दिलंय. काही मुद्दे देत रोखठोक सदरातून हे लिहिण्याची हिंमत दाखवा असे म्हटले आहे.

 पोलीस आयुक्तांच्या बदल्यांवरून झालेलं नाराजीनाट्य, पारनेर नगरसेवकांची फोडाफोडी आणि घरवापसी, शेतकरी कर्जमाफी आणि बोगस बियाणांचा पुरवठा असे विषय चंद्रकांत पाटील यांनी सामनाच्या ‘रोखठोक’ सदरासाठी संजय राऊत यांना सुचवले आहेत.

सामना वृत्तपत्रातील या आठवड्यातील ‘रोखठोक’ साठी माझे प्रस्ताव असे म्हणत ट्विट केले आहे. हे सर्व भाजपची राज्य सरकार पडण्याची इच्छा आहे म्हणून असे पालुपद लावणाऱ्या राऊत यांना हेच वाक्य सुनावत हे मुद्दे दिले आहेत. यामध्ये त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे:

1. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय १० आयपीएस अधिकाऱ्यांची बदली… ठाकरे सरकारचा कारभार अतिशय पारदर्शी आहे… तीन दिवसात बदलीचे आदेश रद्द… मुख्यमंत्री कोण आहेत हे तर आम्ही दाखवून दिलं….हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…”

2.पारनेर नगरपरिषदेत अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला… सर्वांना आपापला पक्ष वाढवण्याची इच्छा होतच असते… पवार साहेब आणि ठाकरे साहेब दोन्हीही आपलेच आहेत… मात्र तरीही शिवसेना शांत बसणार नाही… हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…”

3.ठाकरे सरकार तर सर्वोत्तम आहे… यापूर्वी राज्याला असे प्रशासन कधीही लाभले नाही…. मात्र कोरोनाचा मृत्युदर वाढत चालला आहे… दिवसाला ६ हजार पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत… हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे..

4. राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफी केल्याचे ढोल बडवले… अजून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही कारण भाजपची हे सरकार पाडण्याची इच्छा आहे म्हणून.

राज्यात सुरु असलेल्या महाविकास आघाडीतील बेबनाव आणि कारभारावरून टीका करत पाटील यांनी पुढच्या सदरात राज्यातील विषयाला हात घालण्याचा सल्ला राऊत यांना दिला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था