कोल्हापूरमध्ये निवडून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात जाईन, चंद्रकांत पाटील यांचे विरोधकांना आव्हान


कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदार संघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल. जर निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन, असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. chandrakant patil news


विशेष प्रतिनिधी

पुणे : कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदार संघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल. जर निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन, असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.chandrakant patil news

पाटील यांच्या वर्षपूर्ती कार्यालय अहवालाचे प्रकाशन पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाटील म्हणाले की मागील वर्षी विधानसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हा मला अमित शाह यांनी सांगितले की, आपको विधानसभा निवडणूक लढनी पडेगी.chandrakant patil news

अमितभाई माझा अजून विधान परिषदेचा एक महिना शिल्लक आहे मला कुठे यात अडकून ठेवता? मी जर मोकळा राहीलो तर महाराष्ट्रभर फिरेन. आपण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाचे जास्त जागा निवडून आणू. मात्र अमितभाईंनी आग्रह धरला तुला विधानसभा लढवायची असून आपको पुना मैं कोथरूडसे लढना है. त्यानंतर माझ्या नावाची या मतदार संघातून घोषणा झाली.

chandrakant patil news

त्यानंतर आजवर माझ्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. मला मिळालेल्या शिकवणीनुसार कोणी ही कितीही आरोप प्रत्यारोप केले तरी आपण आपले काम करीत रहायचे आणि तेच मी आजवर करीत आलो आहे. जे मला म्हणतात ना कोल्हापूरमधून पळून आले. ते तिथे निवडून आले नसते. मात्र मी आज मी एक चॅलेंज देतो की, कोल्हापूरच्या कोणत्याही मतदारसंघातून निवडून येऊ शकतो.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था