मुख्यमंत्र्यांना भेटून उपयोग काय? राज्य तर पवारच चालवतात, राज्यपालांपाठोपाठ चंद्रकांतदादांनीही हाणला टोला


  • मुख्यमंत्री काहीच करत नसल्यामुळे शिवसैनिकही राष्ट्रवादीवर प्रचंड नाराज

विशेष प्रतिनिधी

सांगली : राज्यपालांपासून राज ठाकरेंपर्यंत महाराष्ट्रातले सगळे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वाभाडे काढताना दिसताहेत. आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राज ठाकरे यांना शरद पवारांची भेट घेण्याचा सल्ला दिला तर दुपारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राज्य तर शरद पवार चालवातात असा टोला हाणला. (chandrakant patil latest news)

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून काय उपयोग? सध्या शरद पवार हेच राज्य चालवतात. त्यामुळे त्यांनाच भेटले पाहिजे. शिवाय, मुख्यमंत्र्यांपेक्षा राज्यपाल आणि शरद पवार हेच भेटीसाठी जास्त उपलब्ध असतात,’ अशी खोचक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर त्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. ‘उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी सरकार चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट केले आहे. पवारच सध्या सरकार चालवतात. त्यामुळं एखाद्या प्रश्नासाठी पवारांनाच भेटले पाहिजे,’ असं पाटील म्हणाले.

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेतील काही नेत्यांनी त्यांना ऑफरही दिली होती. पंकजा यांनी दसरा मेळाव्याच्या सभेत भूमिका स्पष्ट केली असली तरी चर्चा सुरूच आहेत. त्यातच पंकजा यांनी नुकतंच शरद पवारांचं कौतुक केलं होतं. त्यामुळं उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं.

chandrakant patil latest news

चंद्रकांत पाटील यांना त्याबाबत विचारलं असता ते म्हणाले, ‘पंकजा मुंडेंनी शरद पवारांचे कौतुक केले ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत. मात्र, शरद पवार बाहेर पडतात याचं कौतुक आहे. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. जयंत पाटील यांनीही सांगलीत भाजपच्या नेत्यांचे कौतुक केले आहे.’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी कोश्यारी यांनी राज ठाकरेंना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला. त्याबाबत विचारलं असता, ‘माझ्या एकाही पत्राला मुख्यमंत्री कार्यालयातून उत्तर आलेले नाही. त्यामुळं राज्यपालांनी राज यांना दिलेला सल्ला योग्यच आहे,’ असं पाटील म्हणाले

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती