हिंमत असेल तर वेगवेगळे लढा, कोण जास्त मतं मिळविते बघू, चंद्रकांत पाटील यांचे महाविकास आघाडीला आव्हान


हिंमत असेल तर वेगवगेळं लढा. कोण जास्त मतं मिळवते बघू, असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांन शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीला दिले आहे. महाविकास आघाडी सरकार जर ५ वर्ष चालणार असेल तरी देखील आमचा काही आक्षेप नाही. आम्ही प्रखर विरोधी बनून अन्यायाविरुद्ध सरकारची झोप उडवत राहू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (chandrakant patil latest news)


विशेष प्रतिनिधी

पुणे : हिंमत असेल तर वेगवगेळं लढा. कोण जास्त मतं मिळवते बघू, असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीला दिले आहे. महाविकासआघाडी सरकार जर ५ वर्ष चालणार असेल तरी देखील आमचा काही आक्षेप नाही. आम्ही प्रखर विरोधी बनून अन्यायाविरुद्ध सरकारची झोप उडवत राहू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पुण्यता पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, तुम्हाला घटना मान्य आहे की नाही? राज्यघटनेनुसार राज्यपाल हे कुठल्याही राज्याचे प्रमुख असतात. त्यांनी शपथ दिल्याशिवाय तुम्ही मुख्यमंत्रीच होत नाहीत. त्यांनी शपथ दिल्याशिवाय तुम्ही मंत्री होऊ शकत नाहीत. अगदी उच्च न्यायालयच्या न्यायाधीशांना देखील राज्यपालांकडून शपथ घ्यावी लागते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, पाच वर्षे तुम्ही सरकार चालवणार यावरही आमचा आक्षेप नाही. एकत्र निवडणुका लढवाल यावरही आक्षेप नाही. आमची सगळ्यासाठी तयारी आहे. तुम्ही जर पाच वर्षे सरकार चालवलं तर प्रखर विरोधी म्हणून तुमची झोप हराम करण्याची आमची तयारी आहे. तुम्ही तिघे एकत्रं लढणार. मी तर तुम्हाला आव्हान देतो की हिंमत असेल तर वेगवगेळं लढा. कोण जास्त मतं मिळवतं बघू. हिंमत नाही त्यामुळे एकत्र येऊन लढतात. झेंडा वेगळा, तत्वं वेगळी आणि एकत्र लढतात हे कसं काय चालणार? हिंमत असेल तर वेगवेगळं लढून दाखवा. परंतु, तुमच्यात हिंमत नाही म्हणून तुम्ही तिघे एकत्र लढणार. आम्हाला काय फरक पडतो आम्ही त्याची तयारी करू.

chandrakant patil latest news

पाटील म्हणाले की, सगळ्या जगभरातील भविष्य व्यक्त करण्याचा ठेका संजय राऊत यांना दिलेला असल्याने, त्यांनी काही म्हटलं यावर मी काय बोलणार. आमची भूमिका स्पष्ट आहे. जर तुम्ही लोकल सुरू करत आहात, तर त्या लोकलमध्ये श्वास घ्यायला देखील वाव नसतो. एकमेकांचे श्वास एकमेकांच्या नाकात जात असतात. तिथं तुम्हाला संसर्ग होणार नाही का? मी लोकल सुरू करण्याबाबत टीका करत नाही. शेवटी हळूहळू जनजीवन सुरळीत करावं लागणार. किती दिवस हाताची घडी घालून बसणार. लोकल चालते, ट्रेन चालते, विमान चालतं. उद्या १ तारखेपासून गार्डन चालतात, मग मंदिरं का नाही?

भाजपावर टीका करणं, ही संजय राऊत यांची ड्युटी आहे आणि ते आपली ड्युटी योग्यपणे पार पडत आहेत. मात्र, इतरांनी टीका केलेली त्यांना चालत नाही, त्यांना लगेच टोचते असे सांगून पाटील म्हणाले, तसेच शरद पवारांचा सल्ला मुख्यमंत्री घेतात, हे संजय राऊतांनी मान्य केलं आहे. म्हणजे पवार सरकार चालवतात हे शिवसेनेनं मान्य केले.

chandrakant patil latest news

हिंदुत्वावरूवन निशाणा साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्यांचे हिंदुत्व वेगळंच आहे. कारण, त्यांच्या सोबत सत्तेत असलेल्या काँग्रेसने सावरकरांवर टीका केली तरी देखील आपण ऐकलंच नाही, असे दाखवून कानात बोळे घालून बसणं हे त्यांचं हिंदुत्व आहे. आम्ही छातीठोकपणे सांगतो की, आम्ही घटनेतील जो सर्वधर्म समभाव आहे तो मानतो. पण त्यात जर हिंदुंवर अन्याय म्हणजे जर सर्वधर्मसमभाव असेल, तर आम्हाला मान्य नाही, तो त्यांना मान्य आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था