एका राज्यातील मुठभर शेतकऱ्यांच्या मदतीने देश वेठीस, चंद्रकांत पाटील यांची टिका


सहा महिन्यांपूर्वी हे तीन कृषी सुधारणा कायदे झाले असताना, आता विरोधकांना जाग आली आहे. हे कायदे शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहेत असे म्हणत आहेत. याचा अर्थ सहा महिने काय ते झोपा काढत होते का? एका राज्यातील मूठभर शेतकऱ्यांच्या मदतीने गेल्या ४० दिवसांपासून प्रामुख्याने दिल्ली व देश वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. Chandrakant Patil farmer protest latest news


विशेष प्रतिनिधी

कणकवली : सहा महिन्यांपूर्वी हे तीन कृषी सुधारणा कायदे झाले असताना, आता विरोधकांना जाग आली आहे. हे कायदे शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहेत असे म्हणत आहेत याचा अर्थ सहा महिने काय ते झोपा काढत होते का? एका राज्यातील मूठभर शेतकऱ्यांच्या मदतीने गेल्या ४० दिवसांपासून प्रामुख्याने दिल्ली व देश वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ कणकवली येथे चंद्रकांत पाटील, भाजपा नेते खासदार नारायण राणे, आमदार रविंद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. पाटील म्हणाले की, देशभरात बाकी ठिकाणी कुठेही या कायद्याला विरोध नाही उलट समर्थन आहे. त्यामुळे सहा महिन्यानंतर जाग आल्यानंतर एका राज्यातील मूठभर शेतकऱ्यांच्या मदतीने ४० दिवसांपासून प्रामुख्याने दिल्ली व देश वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर जर देशभरातील शेतकरी रस्त्यावर आले नाही आणि त्यांनी हे काय नाटक सुरू आहे? आमचा कृषी कायद्याला पाठिंबा आहे असं म्हटलं नाही तर त्यांचं (विरोधकांचं) खरं होईल.पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात या कायद्याला विरोध नाही. मग आपण रस्त्यावर का यायचं? तर, ते (विरोधक) रस्त्यावर येऊन थेट कॅनडापासून जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की आमच्यावर अन्याय होत आहे. म्हणून आपल्याला हे कायदे आमच्या फायद्याचे आहेत, या कायद्यामुळे आमचं आयुष्य समृद्ध होणार आहे हे जगाला सांगावं लागणार आहे. मूठभर शेतकरी दिल्लीत बसले आहेत. तिथं काय-काय सुरू आहे हे आपल्याला माध्यमांद्वारे दिसत आहे. त्याला उत्तर म्हणून हे दाखवण्याची आवश्यकता आहे की संपूर्ण देश मोदींच्या पाठीशी आहे. संपूर्ण देश या कायद्यांच्या बाजूने आहे. संपूर्ण देश या कायद्याचं समर्थन करतो आहे. हे दाखवण्याचा एक भाग ते दाखवण्याचं एक माध्यम ही आजची ट्रॅक्टर रॅली आहे.

राहुल गांधींना, उद्धव ठाकरेंना शेतीमधलं काय कळतं? काहीच कळत नसल्याने ते समर्थन कसं करणार? विरोधच करणार, असा आरोप करून माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हिताचा हा नवा कृषी कायदा आहे. या कायद्याने सर्व बंधनं काढून टाकली तर मग चुकलं काय? का इथं आंदोलनं होत आहेत? ही राजकीय आंदोलनं आहेत. यात समेट होईल असं मला वाटत नाही. जे दलाल होते त्यांना आंदोलन करायला लावलं आहे, कामाला लावलं आहे, खर्चाला लावले आहे.

Chandrakant Patil farmer protest latest news

राणे म्हणाले की, पंतप्रधान मोदींकडून एका बाजूला देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना समृद्ध करण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. या देशाचा प्रमुख घटक शेतकरी आहे. शेतकऱ्याला सबळ बनवलं पाहिजे, आर्थिक समृद्ध बनवलं पाहिजे. या कष्टकऱ्याला त्याच्या श्रमाचा फायदा मिळाला पाहिजे. या दृष्टीकोनातूनच त्यांनी हे विधेयक आणलं आहे. मी राज्यसभेचा सदस्य आहे. राज्यसभेत हे विधेयक आलं तेव्हा अतिशय चांगली चर्चा झाली. तेव्हा आमच्या विरोधकांपैकी कुणी विरोध दर्शवला नाही, उलट कौतुक केलं. ७० वर्षांमध्ये काँग्रेसला जे जमलं नाही. शेतकऱ्यांसाठी काही करू शकले नाहीत. तेच आज विरोध करत आहेत, आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकायला देखील बंधनं, कायदे होते. माल कुठं विकायचा? कसा विकायचा? कोणा मार्फत विकायचा? दलाल मार्फत विकायचा आणि मग कष्टाचे पैसै मिळाले नाही तरी तोट्यात जाऊन विकायचा. हे गेली ७० वर्षांमधील कायदे व नियम पंतप्रधान मोदींनी मोडीत काढले असल्याचे राणे म्हणाले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती