चंद्रकांत पाटील राज्यात कोठेही निवडून येतील, पण जयंत पाटलांच्या बॉसला तेच जमत नाही, राम कदम यांची टीका


चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रातून कोणत्याही मतदारसंघातून निवडून येऊ शकतात, मात्र जयंत पाटील यांच्या बॉसला हे अजूनही जमत नाही हेच पाटील जे काही बोलले त्यावरून सिद्ध होत आहे, अशी टीका भाजप नेते राम कदम यांनी केली आहे. Chandrakant Patil can win anywhere; but Jayant Patil’s boss cant do the same, says Ram Kadam


विशेष प्रतिनिधी

मुंबई : चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रातून कोणत्याही मतदारसंघातून निवडून येऊ शकतात, मात्र जयंत पाटील यांच्या बॉसला हे अजूनही जमत नाही हेच पाटील जे काही बोलले त्यावरून सिद्ध होत आहे, अशी टीका भाजप नेते राम कदम यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पूजा मृत्यू प्रकरणी शरद पवार गप्प का असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर ज्याला गाव सोडून जावे लागते अशांबाबत मी काय बोलणार? असे पवार म्हणाले होते.

यावर प्रत्युत्तर देताना राम कदम म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोडलेला बाण अचून वर्मी लागल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इतकी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. आम्ही कधीही व्यक्तिगत टिप्पणी करत नाही.चंद्रकांत पाटील हे महाष्ट्रात कुठूनही निवडून येतात हेच जयंत पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राला सांगितले आहे. पण जयंत पाटील यांचे सर्वेसर्वा इतर कोणत्याही मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याची हिंमत करत नाहीत. हे चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य जयंत पाटील यांच्या वर्मी लागलेले दिसत आहे.

जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांचे वय काढले. त्यांचे वय कितीही असले तरी त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या काळात ते गावागावात फिरले. परंतु तुमचे सर्व मंत्री आणि सरकार मात्र एसी बंगल्यात स्वत:च्या जीवाची चिंता करत होते आणि हे महाराष्ट्र विसरलेला नाही, असेही कदम यांनी म्हटले आहे.

Chandrakant Patil can win anywhere; but Jayant Patil’s boss cant do the same, says Ram Kadam

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी