वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्ली सोडून देशभरात 6 फेब्रुवारीला तीन तास चक्का जाम करण्यात येईल, अशी घोषणा भारतीय किसान युनियनचे राकेश टीकैत यांनी केली. दिल्लीच्या हिंसक घटनेमुळे म्हणजेच गरम दुधाने तोंड पोळल्याने शेतकरी संघटना ताकही फुंकून पिऊ लागल्याचे स्पष्ट होत आहे. Chakka Jam across the country on Saturday except Delhi Burn your mouth with milk and drink it
प्रजासत्ताक दिनी उफाळून आलेल्या हिंसाचारावर सर्वत्र टीका झाल्यावर आंदोलक शेतकऱ्यांनी 6 फेब्रुवारीला दिल्ली सोडून देशभरात तीन तासांचा चक्का जाम करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे चक्का जाम आंदोलनात अडकणाऱ्या लोकांची काळजी घेतली जाणार आहे. त्यांना अन्न आणि पाणी पुरविण्यात येणार आहे. आम्ही सरकार आमच्याशी कसे वागवत आहे, याची माहिती लोकांना देणार आहोत, असे टीकैत यांनी सांगितले.