वृत्तसंस्था
वॉशिंग्टन: अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनी राजीनामा दिला आहे. याबाबतची घोषणा मंगळवारी केली आहे.एडब्ल्यूएसचे सीईओ अँडी जेसी आता जेफ बेझोस यांचे स्थान घेतील.CEO of Amazon Jeff Bezos resigns
जेफ बेझोस आता बोर्डचे कार्यकारी अध्यक्ष असतील. बेझोस यांनी लिहलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, ते पद सोडत आहेत. अँडी जेसी सध्या अॅमेझॉनच्या वेब सर्व्हिसचे प्रमुख आहेत.
स्टार्टअपच्या स्वरुपात अॅमेझॉनची स्थापना बेझोस यांनी केली होती. आता ही कंपनी जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. जेफ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.2020 च्या शेवटच्या तीन महिन्यात 100 बिलियन डॉलरची विक्री कंपनीने केली होती. ज्यामुळे अॅमेझॉचा नफा विक्रमी वाढला होता.