केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! देशातील सर्व सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश ; १०० सैनिक स्कूल सुरू होणार

लष्करात मुलींची संख्या वाढविण्यासाठी आणि महिला व पुरुष समता स्थापित करण्यासाठी सैनिकी शाळांमध्ये आता मुलींना प्रवेश दिला जाणार आहे.Central government’s historic decision! Admission of girls to all military schools in the country; 100 soldiers school will be started


वृत्तसंस्था

नवी दिल्ली: देशातील सर्व सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून सर्व सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश मिळेल.

सैनिकी शाळा ‘सैनिक स्कूल सोसायटी’तर्फे चालवल्या जातात. सैनिक स्कूल सोसायटीवर संरक्षण मंत्रालयाचे नियंत्रण असते. सैनिकी शाळांमध्ये स्त्री – पुरुष समानतेच्या बाबतीत हा महत्त्वाचा निर्णय आहे, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.सैन्यात भरती होण्यासाठी वातावरण तयार करणे हा त्याचा उद्देश होता. सध्या देशात २८ सैनिक स्कूल आहेत.आणखी 100 स्कूल सुरू करणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. 

2021-22 या शैक्षणिक वर्षापासून सर्व सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश दिला जाईल . सैनिकी शाळा सैनिक स्कूल सोसायटीमार्फत चालवल्या जातात. संरक्षण मंत्रालयाचं सैनिक स्कूल सोसायटीवर संरक्षण मंत्रालयाचं नियंत्रण असते.

सैनिकी शाळांमध्ये स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत हा महत्वाचा निर्णय आहे, असं केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.सैन्यामध्ये भरती होण्यासाठी मुलांमध्ये विशेष वातावरण तयार करणं हा त्याचा उद्देश होता.

श्रीपाद नाईक काय म्हणाले?

सैनिकी शाळांमध्ये दोन वर्षांपूर्वी मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सैनिक स्कूल छंगछी, मिझोरम येथे शैक्षणिक सत्र 2018-19 मध्ये मुलींना प्रवेश देण्यात आला होता.

आता 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्यात येणार आहेत, असं श्रीपाद नाईक म्हणाले. पहिलं सैनिक स्कूल महाराष्ट्रातील सातारा येथे स्थापन झालं होते.

देशात 100 सैनिक स्कूल सुरु होणार

केंद्र सरकार देशभरात 100 सैनिक स्कूल स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन येत आहे. सैनिक स्कूल सोसायटीवर याबाबत जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सैनिक स्कूल सोसायटीकडे संलग्नता प्रस्तावांना मंजुरी देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

ज्या सैनिक स्कूल प्राथमिक व्यवस्था, गुणवत्ता आणि निकष पूर्ण करतील त्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात येतील. सैनिक स्कूल सोसायटी ही संलग्नता प्रक्रियेतील महत्वाची संस्था असेल. त्यांच्याकडून सलंग्नता प्रस्ताव मंजूर केले जातील, अशी सूत्रांची माहिती आहे.

सरकारी संघटना, खासगी संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्यानं देशभरात सैनिक स्कूलची स्थापना केली जाणार आहे. केंद्र सरकार याबाबत योजना तयार करत आहे.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपद नाईक यांनी खासदार कूपनाथ मल्लाह यांनी या बाबतीत माहिती दिली. श्रीपाद नाईक यांनी यावेळी सैनिक स्कूल सरकारी संस्था, खासगी संस्था आणि गैरशासकीय संस्था यांच्याशी संलग्नित करुन चालवल्या जातील, असं म्हटलं.

सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार शिक्षणाची संधी उपलब्ध करुन द्यायची आहे. सैनिक स्कूलच्या शिक्षणद्वारे राष्ट्रप्रेम वाढवणार शिक्षण दिलं जाईल, असं ते म्हणाले. नव्या सैनिकी शाळा सैनिक स्कूल सोसायटीसोबत जोडल्या जातील. याबाबत मार्गदर्शक सूचना बनवल्या जात आहेत,अशी माहिती नाईक यांनी दिली.

Central government’s historic decision! Admission of girls to all military schools in the country; 100 soldiers school will be started

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*