केंद्र सरकार उभारणार आठ नवी शहरे,लोकसंख्या 5 हजारांवर ; प्रत्येकी 1 हजार कोटी देणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एकीकडे लोकसंख्या वाढत असल्यामुळे शहरांचा विस्तार करण्याची मागणी होत आहे. परंतु शहरांचा विस्तार करण्याऐवजी आठ राज्यात 8 नवी शहरे उभारण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. 15 व्या अर्थ आयोगाने त्यासाठी 8 हजार कोटींची तरतूद केली आहे.central government will build eight new cities with a population of over 5,000 1 thousand crore each

गृह आणि शहर निर्माण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. याबाबत मंत्रालय शहर रचनेबाबत माहिती देणार असून प्रत्येक शहरासाठी 1 हजार कोटी देणार आहे. गृहनिर्माण मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर प्रसाद म्हणाले, गेल्या अनेक वर्षात नवी शहरे वसवली गेली नाहीत.या आठ शहरांची प्रत्येकी लोकसंख्या 5 हजारावर असेल. प्रती चौरस किलोमीटरवर लोकसंख्येची घनता 400 अशी असेल. 75 टक्के पुरुष शेती व्यतिरिक्त काम करतील. देशाला नवी शहरे हवी आशेत. तसेच ती योजनाबद्ध पद्धतीने कमी लोकसंख्या असलेली उभारण्याची काळाची गरज असून त्या दिशेने विचार सुरू आहेत. त्याचे प्रारूप लवकरच जाहीर होणार आहे.

नवी शहरे कशी असतील

1) आठ राज्यात आठ शहरे उभारणार
2) लोकसंख्या 5 हजारावर असेल
3) लोकसंख्येची घनता प्रती चौरस किलोमीटरवर 400 जण अशी असेल
4)75 टक्के पुरुष शेती व्यतिरिक्त काम करतील
5) प्रत्येक शहराला 1 हजार कोटी देणार

central government will build eight new cities with a population of over 5,000 1 thousand crore each

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*