लडाखच्या भाषा संस्कृती संवर्धन आणि विकासासाठी लडाखी नागरिकांसह केंद्र सरकारची समिती; अमित शहांचा निर्णय

केंद्रशासित प्रदेश लडाखचा विकास आणि भाषा संस्कृतीच्या संरक्षणासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतलाय. Central Government Committee with Ladakh Citizens for the Preservation and Development of Language and Culture of Ladakh; Amit Shah’s decision


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेश लडाखचा विकास आणि भाषा संस्कृतीच्या संरक्षणासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतलाय. ही समिती लडाखच्या विकासात स्थानिक रहिवाशांना सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासोबतच इतर समस्यांवर उपाय शोधण्याचेही काम करेल.

गृहमंत्री अमित शहा यांनी लडाखच्या एका प्रतिनिधी मंडळाशी केंद्रशासित प्रदेशाशी निगडीत मुद्यांवर चर्चा केली. लडाखच्या विकासासाठी तसेच भूमी संस्कृतीच्या संरक्षणासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. सरकारने लडाखच्या नागरिकांकडून कित्येक दशकांपासून करण्यात आलेली केंद्रशासित राज्य करण्याची मागणी पूर्ण करत आपली वचनबद्धता सिद्ध केल्याचेही अमित शहा यांनी म्हटले आहे.गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांच्या नेतृत्वात समिती ही समिती लडाखची भाषा, संस्कृती आणि भूमीच्या संरक्षणासाठी तसेच लडाखच्या नागरिकांच्या विकासासाठी सहभाग देणार आहे. नागरिकांच्या प्रश्नांची योग्य उत्तर शोधून काढण्याचेही काम ही समिती करेल.

Central Government Committee with Ladakh Citizens for the Preservation and Development of Language and Culture of Ladakh; Amit Shah’s decision

या समितीत गृहमंत्र्यांची भेट घेणाऱ्या प्रतिनिधी ममंडळातील काही व्यक्ती, लडाखचे निर्वाचित सदस्य, लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काऊन्सिल सदस्य भारत सरकार आणि लडाख प्रशासनाचे सदस्य यांचा समावेश असेल. समितीचे सदस्य मिळून प्रतिनिधी मंडळाच्या प्रश्नांना उत्तरे शोधण्याचे काम करतील.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*