केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार जानेवारीत वाढणार; मोदी सरकारची भेट; महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या 1 कोटी पेक्षा जास्त कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पगारात जानेवारीत वाढ होणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने नववर्षाची भेट दिल्याचे मानण्यात येत आहे. Central employees’ salaries to be increased in January

जानेवारीपासून केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना त्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) 4 टक्के वाढ मिळणार असल्याचे समजते. सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार डीएमध्ये वाढ होईल.केंद्र सरकारने सर्व कर्मचार्‍यांना सातव्या केंद्रीय वेतन आयोगांतर्गत ‘दिव्यांग भरपाई’ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जे कर्तव्यात अक्षम होतात. परंतु सेवेत कायम आहेत ते या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, “या बदलामुळे सीआरपीएफ, सीआयएसएफ, बीएसएफसह इतर सीएपीएफ जवानांना मोठा दिलासा मिळेल.”

” निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब पेंशनधारक किंवा ज्येष्ठ झाल्यावरही सरकारी नोकरदारांचे जीवनमान सुलभ करणे हे प्रमुख उद्दिष्ट होते, असे ”जितेंद्रसिंग म्हणाले. सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस (सीसीएस) (ईओपी) नियमांनुसार अपंगत्वाच्या लाभांच्या पूर्वीच्या तरतुदीनुसार 1 जानेवारी 2004 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या आणि राष्ट्रीय पेन्शन सिस्टम (एनपीएस) अंतर्गत समाविष्ट असलेल्या कर्मचार्‍यांना दिली गेली नाही.

Central employees’ salaries to be increased in January

कार्मिक मंत्रालयातील निवृत्तीवेतन विभागाने नवीन आदेश दिल्यानंतर आता एनपीएस अंतर्गत समाविष्ट असलेल्या सरकारी सेवकांना एक्स्ट्राऑर्डिनरी पेंशन (ईओपी) च्या नियम (9) अंतर्गत लाभ मिळतील.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*