पोलीस बळाविरुध्द भारतीयांचा पहिला हुंकार असलेल्या चौरीचौरा घटनेचा शताब्दी महोत्सव, योगी सरकार करणार वंदे मातरम गायनाचा विश्वविक्रम

पोलीसी बळाविरुध्द भारतीयांचा पहिला हुंकार असलेल्या चौरीचौरा घटनेचा शताब्दी महोत्सव उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारतर्फे साजरा करण्यात आला आहे. यानिमित्ताने वंदे मातरम गायनाचा विश्वविक्रम होणार आहे.Centenary celebrations of Chaurichaura incident India’s first outcry against police force


वृत्तसंस्था

लखनऊ : पोलीसी बळाविरुध्द भारतीयांचा पहिला हुंकार असलेल्या चौरीचौरा घटनेचा शताब्दी महोत्सव उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारतर्फे साजरा करण्यात आला आहे. यानिमित्ताने वंदे मातरम गायनाचा विश्वविक्रम होणार आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरीचौरा येथे २२ पोलीसांना जाळून मारण्यात आले असे आजपर्यंतच्या इतिहासात शिकविले जाते. महात्मा गांधी या घटनेमुळे व्यथित होऊन असहकार आंदोलन मागे घेतले, असे सांगण्यात येते.त्यामुळे चौरीचौरा येथील घटना म्हणजे केवळ पोलीस चौकी जाळल्याची घटना असे वाटते. परंतु, फ्रान्सच्या स्वातंत्र्यप्रेमी जनतेने बॅस्टिल तुरुंगावर मिळविलेल्या विजयाप्रमाणेच चौरीचौराची घटना होती.

चौरीचौरा येथी घटना म्हणजे केवळ इंग्रजांविरुध्दचे बंड नव्हते तर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन कॉंग्रसेने जमीनदारीच्या प्रथेचे समर्थन करणारी निती बनविली होती त्याविरुध्दचा असंतोष होता.

४ फेब्रुवारी १९२२ रोजी चौरीचौराच्या आसपासच्या ४० किलोमीटरच्या परिघातील ६० गावांमधील गरीब शेतकऱ्यांनी व्रिदोह सुरू केला. इंग्रजी शासनाचे प्रतिक असलेल्या पोलीस चौकीला आग लावली.

योगी आदित्यनाथ यांनी या जाज्वल्य इतिहासाची आठवण म्हणून शताब्दी महोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. निश्चित कालावधीत वंदे मातरम गायनाचे 50 हजार व्हिडीओ अपलोड केले जाणार आहेत. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये होणार आहे. चौरीचौरा घटना आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला श्रध्दांजली वाहण्यासाठी वंदे मातरमचे गायन होणार आहे. चीनमधील बीजिंग येथे २०२९ मध्ये १० हजार ३६९ व्हिडीओ अपलोड होण्याचा यापूर्वीचा विक्रम होता.

चौरी चौरा घटनेचा रोमहर्षक इतिहास तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी वर्षभर कार्यक्रम राबवावेत. शाळा-महाविद्यालयांमध्ये स्पर्धाचे आयोजन करावे, असे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे.

Centenary celebrations of Chaurichaura incident India’s first outcry against police force

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*