‘हा तर ट्रेलर आहे’ घटनास्थळी इस्रायली राजदूताच्या नावाने सापडली चिठ्ठी ; सिसीटिव्ही फुटेजमध्ये 2 संशयीत आढळले


वृत्तसंस्था

नवी दिल्ली: शुक्रवारी दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाशेजारी झालेल्या स्फोटातील तपास तीव्र झाला आहे. स्फोटात अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला असे फॉरेन्सिक टीमच्या तपासणीत आढळले आहे. Cctv footage shows 2 suspected Note found in the name of israeli ambassador on the spot

गुन्हे शाखेच्या टीमला अर्धी जळालेली गुलाबी रंगाची ओढणी आणि इस्त्रायली राजदूताच्या नावाने एक लिफाफा मिळाला आहे. या लिफाफ्यातून एक चिठ्ठीही मिळाली आहे. त्यात ‘हा ट्रेलर आहे’ असे लिहिले आहे. फॉरेन्सिक टीमने आता फिंगर प्रिंट तपासण्यास सुरुवात केली आहे.


दिल्लीत बिटिंग रिट्रीटमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान विजय चौकात हजर असताना दीड किमी दूर इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट; जीवितहानी नाही; स्फोटानंतर अब्दुल कलाम रोडवर नाकेबंदी


पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्हीमध्ये दोन संशयितांची ओळख पटवली आहे. ते टॅक्सीवरून खाली उतरताना दिसत आहेत. पोलिसांनी कॅब चालकाची चौकशी सुरू केली आहे. त्या आधारे संशयितांचे स्केच तयार केले जात आहे. रात्री उशिरा पोलिसांनी अनेक भागात छापा टाकला. दोन जणांना ताब्यात घेऊन चौकशीही सुरू केली आहे.

दोन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेनंतर भारतातील इस्त्रायली राजदूत रॉन मालका यांनी दोन देशांमधील मुत्सद्दी संबंधांच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त ही घटना घडली. हल्लेखोर आणि त्यांचे हेतू शोधण्यासाठी आम्ही भारतीय अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करत आहोत अशी प्रतिक्रिया दिली.

Cctv footage shows 2 suspected Note found in the name of israeli ambassador on the spot

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था