तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या मेव्हणीची सीबीआयकडून कसून चौकशी

विशेष प्रतिनिधी 

कोलकता : तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची मेव्हणी मेनका गंभीर यांची केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कोळसा चोरीप्रकरणी सोमवारी त्यांच्या कोलकात्यातील निवासस्थानी चौकशी केली.CBI probes Trinamool Congress MP Abhishek Banerjee’s sister-in-law

गंभीर यांना यासंदर्भात रविवारी (ता. २१) नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी त्यांची या प्रकरणातील भूमिका जाणून घेण्यासाठी आज तीन तास चौकशी केली. मेनका गंभीर यांनी यापूर्वी आपण कोलकात्यातील हरिष मुखर्जी रस्त्यावर २३ फेब्रुवारीला सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत उपलब्ध असू, असे सीबीआयला कळविले होते. अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी ऋतुजा यांच्या मेनका या बहिण आहेत.

प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अभिषेक बॅनर्जी पुतणे आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सीबीआयने कोळसा चोरी प्रकरणी मांझी उर्फ लाला, ईस्टर्न कोलफिल्ड लि.चे व्यवस्थापकीय संचालक अमित कुमार धर आणि जयेश चंद्र राय आदींविरुद्ध ‘एफआयआर’ नोंदविला होता.

CBI probes Trinamool Congress MP Abhishek Banerjee’s sister-in-law

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*