चोराच्या हाती जामदारखान्याच्या किल्या नको; सत्ताधाऱ्यांच्या शिखर बॅँक घोटाळ्याची सीबीआयतर्फे चौकशीची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बॅँक) कथित घोटाळ्यातील सर्व आरोपी सत्तेवर आहेत. तपास यंत्रणा त्यांच्या दबावाखाली तपास करत आहे. त्यामुळे या घोटाळ्याचा असल्याने या घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. CBI must conduct inquiry into scam of Maharashtra Apex Bank

या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. मात्र, राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या दबावाखाली पोलीस तपास करत आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या बहुतांश मंत्र्यांसह अनेक जण यामध्ये अडकले आहेत. राज्याचा गृह विभाग राष्ट्रवादीच्या अखत्यारीत असल्याने पोलीस तपास करू शकणार नाहीत. त्यामुळे हा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.शिखर बँक घोटाळ्यातील सर्व आरोपी सत्तेत असल्याने तपास यंत्रणा दबावाखाली तपास करीत आहे. तपास पूर्ण करण्याआधीच त्यांनी घोटाळ्यातील संशयित राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना क्लीन चिट दिली. सर्व आरोपी सत्तेत असल्याने तपास योग्य प्रकारे करण्यात येईल, अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही. याबाबत दखलपात्र गुन्हा नोंदवू शकत नाही, असा धोशा सुरुवातीपासूनच तपास यंत्रणा लावत होती. अखेरीस पोलिसांनी या प्रकरणी सत्र न्यायालयात समरी अहवाल सादर केला. यावरूनच तपास यंत्रणेची स्थिती लक्षात येते, असे या प्रकरणातील मुळ याचिकादार सुरिंदर अरोरा यांनी याचिकेत म्हटले आहे.

सहकारी साखर कारखान्यांच्या भागधारकांचेही जबाब नोंदविण्यात आले नाहीत. तसेच कॅग, नाबार्डने सादर केलेले अहवाल विचारात घेण्यात आला नाही, असे अरोरा यांनी याचिकेत म्हटले आहे. अरोरा यांनी केलेल्या जनहित याचिकेवरूनच काही वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने सर्व संबंधित साखर कारखान्याच्या व सहकारी बँकांच्या तत्कालीन संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आरोपींविरोधात पुरेसे पुरावे असूनही समाधानकारक तपास न करण्यात आल्याने अरोरा यांनी पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

CBI must conduct inquiry into scam of Maharashtra Apex Bank

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*