इंडो-कॅनेडियन समूहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना कृषी कायद्याच्या विरोधात नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्याची मागणी केली आहे. ट्रुडो यांनी यूएस कॅपिटल हिलवर झालेल्या हिंसाचाराचा नुकताच निषेध केला होता. Canada PM justin trudeau Must Condemn Delhi Red Fort violence, Demands Indo-Canadian organization In letter
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इंडो-कॅनेडियन समूहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना कृषी कायद्याच्या विरोधात नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्याची मागणी केली आहे. ट्रुडो यांनी यूएस कॅपिटल हिलवर झालेल्या हिंसाचाराचा नुकताच निषेध केला होता.
इंडो-कॅनेडियन्सच्या नॅशनल अलायन्सचे अध्यक्ष डॉ. आझाद कौशिक यांनी ट्रूडो यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, इंडो-कॅनेडियन समाजाच्या भावना प्रतिबिंबित करण्यासाठी ते पंतप्रधानांना पत्र लिहीत आहेत. त्यांनी असेही म्हटले आहे की, गुरपुरबच्या वेळी ट्रुडो यांनी व्हर्च्युअल बैठकीत कृषी कायद्यांवर व्यक्त केलेल्या मतांनी आम्ही चिंतित आहोत.
ट्रूडो यांनी जानेवारीत यूएस कॅपिटल हिल हिंसाचाराचे वर्णन “लोकशाहीवरील हल्ला” असे केले होते. याचा संदर्भ देत पत्रात असे म्हटले आहे की, “भारतीय लोकशाहीवरही असाच हल्ला आणि हिंसाचार झाला आहे. हे अतिरेकी घटकांनी शेतकऱ्यांच्या वेशात केले, परंतु कॅनडाने त्याचा निषेध केला नाही.”
ट्रूडो यांनी निषेध करण्यासाठी आणि त्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी बोलविण्यात आले आहे. आझाद कौशिक म्हणाले, “असे केल्याने शेतकऱ्यांच्या आडून अतिरेकी तत्त्वांना मोठ्या प्रमाणात थोपवण्यात मदत होईल. तसेच इंडो-कॅनेडियन समुदाय आणि कॅनडामध्ये विशिष्ट धारणा तयार होणे टळेल.”
कॅनाडाच्या पंतप्रधान कार्यालयाने हे पत्र मिळाल्याला दुजोरा दिला आहे. कॅनडा पीएमओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “तुमच्या मुद्द्यांचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करण्यात आले आहे, याबद्दल निश्चिंत राहा. पुढील कार्यवाहीसाठी हे पत्र कॅनडाचे परराष्ट्रमंत्री मार्क गेर्नो यांच्याकडे पाठवण्यात आले.”
दरम्यान, इंडो-कॅनेडियन संघटनेचे अध्यक्ष डॉ. आझाद कौशिक यांनी नुकतेच एक ट्विट शेअर केले असून ज्यात कशा प्रकारे भारतातील कृषी कायद्यांविषयी वृत्तपत्राच्या माध्यमातून अपप्रचार केला जातोय हे दिसून येते. आपल्या ट्वीटमध्ये कौशिक म्हणतात, एकट्या शिखांनी (भारतातील लोकसंख्येच्या 2%) भारतात शेती समूहाची स्थापना केली, आणि आंदोलनाचा त्यांच्यावर परिणाम झालाय, हे वाचून आश्चर्य वाटतेय. फेसबुक आणि कॅनेडियन प्रेस न्यूजद्वारे वित्तपुरवठा करणार्या ग्लोबचे अशी विचित्र बातमी, राष्ट्रीय दैनिकाकडून अशा पत्रकारितेची अपेक्षा नाही…
#Globe Amusing to read as if Sikhs alone(2% of population in India) constituted farming community in India or were affected by the protests. Such bizarre reporting by Globe, funded by Facebook and Canadian Press News, doesn’t behove serious journalism expected of a national daily pic.twitter.com/s8MweNc2Pg
— Azad K Kaushik (@azadkaushik) February 3, 2021
Canada PM justin trudeau Must Condemn Delhi Red Fort violence, Demands Indo-Canadian organization In letter
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची 551व्या जयंतीनिमित्त गुरुपुरबच्या दिवशी एका व्हर्च्युअल कार्यक्रमात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी वादग्रस्त भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, “जर मी भारतातील शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष केले तर ते योग्य ठरणार नाही. शांततापूर्ण निषेधाच्या हक्काचे रक्षण करण्यात कॅनडा नेहमीच अग्रणी आहे. परस्पर संवादावर आमचा विश्वास आहे. म्हणूनच आम्ही आपली चिंता व्यक्त करण्यासाठी विविध माध्यमांद्वारे थेट भारतीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलो आहोत.” त्यांच्या या वक्तव्यावर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया दर्शवण्यात आली आणि यानंतर द्विपक्षीय संबंधांवर विपरीत परिणाम झाला होता.