Cabinet expansion likely in first week of April, Anil Deshmukh to go home?

Cabinet expansion : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, देशमुखांचे गृह मंत्रिपद जाणार?

Cabinet expansion : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. आता देशमुख या मंत्रिपदावर राहतील की जातील, याबाबत अद्यापही स्पष्टता नाहीये. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. आता देशमुख या मंत्रिपदावर राहतील की जातील, याबाबत अद्यापही स्पष्टता नाहीये. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मंत्रिमंडळ विस्तारात अनिल देशमुख यांच्याकडून गृह मंत्रालयाचा पदभार काढून घेण्यात येण्याची शक्यता जास्त आहे. यातून कॉंग्रेसच्या इतर काही आमदारांनाही मंत्रिपदात सामावून घेण्यात येण्याची चर्चा सुरू आहे. परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर ठाकरे सरकार आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसवर देशमुख यांना गृह मंत्रालयातून हटवण्यासाठी दबाव वाढत आहे.

गृहमंत्रिपदी कोण?

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बोलायचे झाल्यास, सर्वात मोठा वाद हा गृह खात्यावरूनच होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून हटवणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. गृहमंत्रिपदासाठी जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशी दोन नावे शर्यतीत आहेत. महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांचा इतिहास पाहता, यापूर्वीही आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्र्यांकडेच गृह मंत्रालय राहिलेले आहे.

दुसरीकडे, संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर वनमंत्रिपदही रिक्त राहिलेले आहे. तिथेही शिवसेनेला मंत्री द्यावा लागणार आहे. काँग्रेसमध्येही काही आलबेल नाही. नितीन राऊत यांच्याकडे असलेल्या ऊर्जा मंत्राल्यावर नाना पटोलेंचा डोळा असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे नाना पटोलेंना ऊर्जामंत्रिपद दिले जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या हप्ते वसुलीचे आरोप

आरोप-प्रत्यारोपांच्या या लढाईत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप ठाकरे सरकारला अडचणीत आणणारे आहेत. देशमुख आणि निलंबित एपीआय वाझे यांची फेब्रुवारीच्या मध्यात भेट झाली असा आरोप परमबीर यांनी केला आहे. मध्य म्हणजे म्हणजे 15 फेब्रुवारी जेव्हा देशमुखांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

फेब्रुवारीच्या अखेरीसही एक बैठक पार पडली, असा परमबीर यांचा दावा आहे. म्हणजे जेव्हा देशमुखांच्या विलगीकरणाचा कालावधी संपतो तेव्हा. परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे महाविकास आघाडी सरकार हादरून गेले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*