Budget Session : अर्थमंत्री सादर करणार आर्थिक सर्वेक्षण, 18 विरोधी पक्षांचा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार

Budget Session: Finance Minister to present Economic Survey, 18 Opposition parties boycott President's address

विविध सीमांवर शेतकरी आंदोलन सुरू असताना संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल आणि 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर केले जाईल. देशातील 18 विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणावर बहिष्कार घोषित केलेला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष गोंधळ घालण्याच्या तयारीत आहेत. Budget Session: Finance Minister to present Economic Survey, 18 Opposition parties boycott President’s address


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : विविध सीमांवर शेतकरी आंदोलन सुरू असताना संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल आणि 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर केले जाईल. देशातील 18 विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणावर बहिष्कार घोषित केलेला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष गोंधळ घालण्याच्या तयारीत आहेत. विरोधी पक्षांनी पूर्व लडाखमधील तणाव, अर्थव्यवस्थेची स्थिती, चलनवाढीचा मुद्दा आणि तीन नवीन कृषी कायद्यांवरून सरकारला घेराव घालण्याची रणनीती आखली आहेत.

काँग्रेससह 18 विरोधी पक्षांनी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकर्‍यांना पाठिंबा म्हणून एकत्र येत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी ही माहिती दिली. राष्ट्रपतींनी संसदेतील भाषणावर बहिष्कार टाकण्याच्या विरोधी पक्षांच्या निर्णयाला केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी यांनी दुर्दैवी म्हटले आहे.विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक, तृणमूल कॉंग्रेस, शिवसेना, सपा, आरजेडी, माकप, सीपीआय, आययूएमएल, आरएसपी, पीडीपी, एमडीएमके, केरळ कॉंग्रेस (एम) ), आम आदमी पार्टी आणि एआययूडीएफने संयुक्तपणे निर्णय घेतला आहे. दिल्लीतील प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्याची मागणीही 18 विरोधी पक्षांनी केली आहे.

Budget Session: Finance Minister to present Economic Survey, 18 Opposition parties boycott President’s address

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घालून विरोधी पक्षांनी त्यांचे हेतू स्पष्ट केले. विरोधी पक्षांनी तीन नवीन कृषी कायद्यांच्या संदर्भात शेतकरी चळवळ आणि त्यासंबंधित घडामोडींवर सरकारला घेरण्याचे धोरण आखले आहे. याशिवाय पूर्व लद्दाखमधील चीनसोबतचा तणाव, अर्थव्यवस्था, महागाई आणि अन्य मुद्द्यांवरूनही संसदेत जोरदार गोंधळ घालण्यात येणार आहे.

Budget Session: Finance Minister to present Economic Survey, 18 Opposition parties boycott President's address

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था