अर्थसंकल्प २०२१ ; सर्वसामान्यांबरोबरच उद्योजकांना दिलासा

कोरोना या जागतिक महामारीच्या काळामध्ये जगातील सर्व राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांना मोठा आर्थिक फटका बसल्याने देशांवर मंदीचे सावट आहे. याला भारतीय अर्थव्यवस्था देखील अपवाद नाही. Budget 2021 Consolation to the entrepreneurs along with the general public


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील तर १ फेब्रुवारीला बजेट सादर केले जाणार आहे. सत्राचे दोन भाग असतील. पहिला भाग २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारी आणि दुसरा भाग ८ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत होमार आहे. संसदीय कामकाज मंत्रिमंडळ समितीने (सीसीपीए) या तारखांची शिफारस केली आहे. यावर मंत्रिमंडळ अंतिम निर्णय घेणार आहे.

कोरोना या जागतिक महामारीच्या काळामध्ये जगातील सर्व राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांना मोठा आर्थिक फटका बसल्याने देशांवर मंदीचे सावट आहे. याला भारतीय अर्थव्यवस्था देखील अपवाद नाही. आता अनलॉक प्रक्रीये दरम्यान अर्थव्यवस्था हळू हळू रुळावर येत आहे. सरकार देखील अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पावले उचलत आहे. मात्र सरकारला देखील मर्यादा असल्याचे मत नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी व्यक्त केले होते. त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प कसा असेल याबद्दल भाष्य केले होते.अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २९ जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. अधिवेशनाच्या दुसर्;या भागात अर्थसंकल्पाच्या प्रस्तावांवर चर्चा होईल. यापूर्वी सरकारने कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावले नव्हते. CCPA ने म्हटले की, अधिवेशन काळात कोरोना विषाणूशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल.

Budget 2021 Consolation to the entrepreneurs along with the general public

अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांबरोबरच उद्योजकांना देखील दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तर गेल्या वर्षभरात अर्थव्यवस्थेची होत असलेली पडझड लक्षात घेता यंदाचा अर्थसंकल्प यावर काय उपाययोजना आणणारा ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*