Farmers Violence :”काठ्या अन् झेंडे घेऊन या” ; हिंसाचारानंतर राकेश टिकैत यांचा व्हिडीओ व्हायरल


प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅली हिंसक झाल्यानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत लाल किल्यावर झालेल्या हिंसेनंतर भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत राकेश टिकैत शेतकऱ्यांना भडकवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. राकेश टिकैत व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत की, “आता सरकार निष्ठुर झालं आहे. त्यामुळे आंदोलनात झेंडा आणि काठ्या घेऊन या.
शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा व्हिडीओ भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी देखील ट्वीट केला आहे.  “Bring sticks and flags”; Rakesh Tikait’s video goes viral after violence

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये राकेश टिकैत म्हणतात की, ते ऐकत नाहीत, जास्तच निष्ठुर झालं आहे सरकार, झेंडा घेऊन या, काठ्याही आपल्यासोबत ठेवा. समजून जा साऱ्या गोष्टी. ठिक आहे? या तुम्ही, आता खूप झालं. तिरंग्यासोबत आपला झेंडाही आणा, या जमिनी वाचवायला. जमिनी वाचत नाहीयेत अशा प्रकारे ते शेतकर्यांना भडकवत आहेत.दरम्यान ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आज सकाळी राकेश टिकैत म्हणाले की, ज्याने झेंडा फडकावला ती व्यक्ती कोण होती? एका समुदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. काही लोकांना भडकवण्यात आलं आहे.

“Bring sticks and flags”; Rakesh Tikait’s video goes viral after violence

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती