BREAKING NEWS : लॉकडाऊन करायचा की नाही ? ; मुख्यमंत्र्यांकडून 8 दिवसांचा अल्टिमेटम ; ‘ मी जबाबदार’ नवीन स्लोगन


  • कोरोना महाराष्ट्रात येऊन आता वर्ष पूर्ण होईल. ती जी परिस्थिती होती ती भयानक होती. पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण होईल. ह्या सर्व काळात समाधानाचा क्षण कोणता? तुम्ही मला तुमच्या कुटुंबातला सदस्य मानलं हा समाधानाचा क्षण. हे असं असायला भाग्य लागतं. 

विशेष प्रतिनिधी 

मुंबई  : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होऊ लागल्याने शासन, प्रशासनासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बऱ्याच कालावधीनंतर राज्यातील जनतेशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनातून कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, याचीही माहिती दिली.BREAKING NEWS: Lockdown or not? ; 8-day ultimatum from CM; The new slogan ‘I am responsible’

लॉकडाऊन करायचा का? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, लॉकडाऊन करायचा का मी पुढचे आठ दिवस पाहणार. ज्यांना नकोय ते मास्क घालून फिरतील, हवाय ते विना मास्क फिरतील, मास्क घाला, लॉकडाऊन टाळा असेही ते म्हणाले .

‘कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. दुसरी लाट आली आहे की नाही हे 10-15 दिवसांत कळेल. पाश्चिमात्य देशांत कोरोना रुग्ण वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. लॉकडाऊन हे कोरोनावरील उत्तर असेल नसेल पण साखळी तोडण्यासाठीचा तो एक पर्याय नक्कीच आहे. आपल्यालाही सर्वांना आता बंधन पाळावंच लागेल. आपण गाफील राहिलो तर आपल्याला पुन्हा कडक लॉकडाऊन करावा लागेल,’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आगामी काळात राज्यात निर्बंध लादण्याचे संकेत दिले आहेत.लसीकरणाचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. त्यामुळे ज्या कोरोना वॉरियर्सने अद्याप लस घेतलेली नाही, त्यांनी ती घ्यावी,’ असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

पुन्हा एकदा बंधनं पाळायला लागणार आहेत. अचानक लॉकडाऊन करणं घातक. उद्या रात्रीपासून जिथं जिथं वाटतं तिथं बंधनं घाला, मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. अचानक लॉकडाऊन घोषीत करु नका. जनतेला चोवीस तासाचा वेळ द्या .

BREAKING NEWS: Lockdown or not? ; 8-day ultimatum from CM; The new slogan ‘I am responsible’

राज्यात कोरोना रुग्णांचा  वाढता आकडा

15 फेब्रुवारी 3365

16 फेब्रुवारी 3663

17 फेब्रुवारी 4787

18 फेब्रुवारी 5427

19 फेब्रुवारी 6112

20 फेब्रुवारी 6281

21 फेब्रुवारी 6971

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी