तृणमूलमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यावर बॉम्बहल्ला, बंगालमधील हिंसाचाराने गाठले टोक

Bomb attack on BJP leader Babu Master in West Bengal

पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराचे थांबण्याचे नाव नाही. पुन्हा एकदा राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीवर हल्ला झाला आहे. यावेळी हल्ला बंगालमधील भाजप नेते फिरोज कमल गाझी ऊर्फ ​​बाबू मास्टर यांच्यावर झाला. शनिवारी संध्याकाळी उशिरा त्यांच्या एसयूव्हीवर क्रूड बॉम्बने हल्ला करण्यात आला. Bomb attack on BJP leader Babu Master in West Bengal


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराचे थांबण्याचे नाव नाही. पुन्हा एकदा राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीवर हल्ला झाला आहे. यावेळी हल्ला बंगालमधील भाजप नेते फिरोज कमल गाझी ऊर्फ ​​बाबू मास्टर यांच्यावर झाला. शनिवारी संध्याकाळी उशिरा त्यांच्या एसयूव्हीवर क्रूड बॉम्बने हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात भाजप नेते गंभीर जखमी झाले आहेत. जखमी अवस्थेत त्यांना कोलकाता येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भाजप नेते सुवेंदू अधिकारी हे मास्टर यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले. येथे त्यांनी जखमी बाबू मास्टर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

बनशती महामार्गावर शनिवारी संध्याकाळी उशिरा अज्ञात लोकांनी बाबू मास्टर यांच्यावर हल्ला केला. या घटनेत बाबू मास्टरच यांची एसयूव्हीचेही नुकसान झाले, तर ते स्वत: गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.उत्तर 24 परगणा येथील जिल्हा पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीला उपस्थित राहून बाबू मास्टर कोलकात्याला परतत होते. परंतु याचदरम्यान बनसती महामार्गालगत अज्ञात लोकांनी त्यांच्यावर क्रूड बॉम्बने हल्ला केला. उत्तर 24 परगणा, बशीरहाटमध्ये बाबू मास्टर एक महत्त्वाचे नेते मानले जातात.

Bomb attack on BJP leader Babu Master in West Bengal

बाबू मास्टर नुकतेच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भाजपमध्ये जाण्यापूर्वी ते तृणमूलचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जात होते. बंगालमध्ये बर्‍याच काळापासून राजकीय हिंसाचार सुरू आहे. यात प्रत्येक पक्षाचे लोक हिंसाचाराचे बळी ठरलेले आहेत. मग ते टीएमसी, भाजप असो वा डावे किंवा कॉंग्रेस असो. काही दिवसांपूर्वीच बंगालमध्ये भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांच्या रॅलीत मोठा गोंधळ उडाला होता.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी