प्रेरक…! अंध लताने श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत केले कळसूबाई शिखर सर

विशेष प्रतिनिधी

परभणी :  महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि चढण्यासाठी कठीण मानले जाणारे कळसूबाई शिखर सर करत लता पांचाळ या दिव्यांग मुलीने एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील उध्दवराव आणि अरुणाबाई यांची मुलगी लता ही नेत्रहीन आह मात्र तीची जिद्द आणि मैत्रीणींची साथ यामुळे हे अवघड शिखर तीने पादाक्रांत केले आहे.  blind Lata did Shri Chhatrapati Shivaji Maharaj saying Ki Jai Kalsubai climbe

दरवर्षी शिवार्जुन प्रतिष्ठानकडून दरवर्षी दिव्यांग युवक-युवतींना कळसूबाई शिखर करण्याची मोहिम आखून प्रोत्साहित केले जाते.


छत्रपती शिवरायांचे अवघ्या 14 व्या वर्षातले कर्तुत्त्व वाचा, शिवाजी वाचा, ५४ वर्षांच्या ‘पप्पू’कडे बघण्याची गरज नाही, गोविंददेव गिरी महाराज यांची टीका


यामध्ये लतानेही भाग घेतला होता. लताने तिच्या काही मैंत्रिणींच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, कळसूबाई माता की जय, हर हर महादेव अशा घोषणा देत चढाईला सुरूवात केली.

blind Lata did Shri Chhatrapati Shivaji Maharaj saying Ki Jai Kalsubai climbe

शेवटी येणाऱ्या चार लोखंडी शिड्या लताने मोठ्या जिद्दीने पार केल्या आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला लताने हे शिखर सर केले.दरम्यान, नववर्षाच्या पहाटे सह्याद्री पर्वताच्या माथ्यावर असलेल्या कळसूबाई मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. तसेच उगवत्या सूर्याला नमस्कार करुन सकाळी १० वाजता परतीची वाट धरत खाली उतरण्यास सुरुवात केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*