नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सर्व फाईल खुल्या कराव्यात ; ममता बॅनर्जी यांची केंद्राकडे मागणी

विशेष  प्रतिनिधी 

कोलकत्ता : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील सर्व गोपनीय दस्तऐवज (फाईल्स) केंद्र सरकारने खुल्या कराव्यात, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केली. BJP’s question after Congress-SP’s opposition to renaming Aurangabad

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे गुढरित्या नाहीसे होण्याचे रहस्य अद्यापि उलगडले नाही. तीन कमिशन नेमूनही काहीही उघड झाले नाही. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजवटीत मुखर्जी कमिशनने बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला नसल्याचे जाहीर करून खळबळ उडवून दिली. परंतु, पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तो अहवाल फेटाळला होता. मात्र, त्यानंतरही त्यांच्याबाबत ठोस असे काहीही समजले नाही. या पार्श्वभूमीवर बॅनर्जी यांनी ही मागणी केली.दरम्यान, केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेवर आल्यावर सरकारने नेतांजी बाबतच्या फाईल खुल्या केल्या होत्या. तसेच आझाद हिंद सेनेच्या रौप्यमहोस्तवी स्थापनादिनी लाला किल्ल्यावर खास सोहळा आयोजित करुन मानवंदना दिली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रध्वजही फडकविला होता. वॉर म्युझियम स्थापन करून त्याचे नंतर उदघाटन केले होते.

BJP’s question after Congress-SP’s opposition to renaming Aurangabad

नेताजी बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती देताना बॅनर्जी म्हणाल्या, स्वातंत्र्यानंतर बोस यांच्यासाठी आपण काहीही केलं नाही. कोलकत्ता येथे 23 जानेवारीला श्यामबाजार ते बोस यांच्या पुतळ्यापर्यंत पोलीस बँड वादनासह रॅली काढली जाईल. त्यात बोस यांच्या जीवनचरित्राचे सचित्र दर्शन घडविले जाईल. हा दिवस देशनायक दिवस म्हणून राज्यात साजरा केला जाईल.

राष्ट्रीय सुटीची पुन्हा मागणी

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासाठी स्वातंत्र्यांनंतर आतापर्यंत आपण काहीही केले गेले नाही. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारीला राष्ट्रीय सुटी जाहीर करावी, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*