‘शिवसेनेचा भगवा आता हिरवा झालाय का?’, औरंगाबाद नामांतरास काँग्रेस-सपाच्या विरोधानंतर भाजपचा सवाल

भाजप नेते किरीट सोमैया म्हणाले की, मुख्यमंत्री त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर टिकून राहतील की नाही, कारण अनेक ठिकाणांहून त्यांना विरोध सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दांवर ठाम राहतील की मित्रपक्षांच्या दबावाखाली माघार घेतील? BJP’s question after Congress-SP’s opposition to renaming Aurangabadविशेष प्रतिनिधी

मुंबई : जेव्हापासून शिवसेनेने औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे बदलण्याचे म्हटले आहे, तेव्हापासून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेने आपल्या मुखपत्र ‘सामना’तून भाजपवर हल्ला चढविला. विरोधी पक्षाचे वागणे ही राज्यासाठी चिंतेची बाब आहे.

जबाबदारी कशी सांभाळावी हे त्यांना शिकवण्याची गरज आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली. त्यानंतर औरंगाबादचे नाव बदलण्याच्या मुद्द्यावरून भाजपने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजप नेते किरीट सोमैया म्हणाले की, मुख्यमंत्री त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर टिकून राहतील की नाही, कारण अनेक ठिकाणांहून त्यांना विरोध सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दांवर ठाम राहतील की मित्रपक्षांच्या दबावाखाली माघार घेतील? असा सवालही सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमैया यांनी ट्विटरवर स्वत:चा एक व्हिडिओ शेअर करताना सांगितले की, कॉंग्रेसनंतर आता समाजवादी पार्टीही असे म्हणत आहे की ‘औरंगजेब’… औरंगाबादचे नाव संभाजीनगर होऊ देणार नाही. आता उद्धव ठाकरे यांना ठरवावे लागेल की, त्यांचा पक्ष आता हिंदूहृदयसम्राटांना मानतो की शिवसेनेचा भगवा आता हिरवा झालाय!

 

नुकतेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख आणि भाजपचे सहयोगी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी औरंगाबादचे नाव बदलण्याच्या निर्णयास त्यांचा विरोध असल्याचे विधान केले असून त्यानंतर समाजवादी पक्षानेही शिवसेनेच्या निर्णयाला विरोध करत म्हटले की, हे फक्त व्होट बँकेच्या राजकारणासाठी केले जात आहे.

BJP’s question after Congress-SP’s opposition to renaming Aurangabad

तथापि, या मुद्द्यावर महाविकास आघाडीमध्ये कोणतेही वाद नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. जे काही होईल ते विचारविनिमय करूनच होईल. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे शिवसेनेच्या निर्णयावर खुश नसले तरी त्यांनी या विषयावर म्हटले आहे की, महाविकास आघाडीच्या कॉमन ध्येयात या मुद्द्याचा समावेश नव्हता. अशा प्रकारच्या निर्णयाला त्यांचा विरोधच राहील.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*