भाजपचे हिमाचल प्रदेशातील खासदार राम स्वरूप शर्मा यांचा दिल्लीतील निवासस्थानामध्ये मृत्यू

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील भाजप खासदार राम स्वरूप शर्मा हे दिल्लीतील निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा तपास सुरू आहे. BJP’s Himachal Pradesh MP Ram Swaroop Sharma death at his residence in Delhi

एकंदरीत हा प्रकार आत्महत्येचा वाटतो. पण, चौकशी सुरु आहे. शवविच्छेदन अहवालानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल, असे दिल्ली पोलिस विभागाचे प्रवक्ते चिन्मय बिस्वाल यांनी सांगितले.

मंडी लोकसभा मतदार संघातून 2014 आणि 2019 मध्ये ते निवडून आले होते. 10जून 1958 मध्ये त्यांचा जन्म जलपेहार या गावी झाला.खासदार राम स्वरूप शर्मा यांच्या मृत्यूबद्दल पंतप्रधान मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. लोकहितवादी नेता देशाने गमावला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, खासदार राम स्वरूप शर्मा हे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या स्थायी समितीचे आणि सल्लागार समितीचेही सदस्य होते.

BJP’s Himachal Pradesh MP Ram Swaroop Sharma death at his residence in Delhi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*