भाजपचे महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन ! पूजा चव्हाण प्रकरणी सरकार गंभीर नाही म्हणूनचं भाजपा कार्यकर्त्यांवर आंदोलन करण्याची वेळ

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपानं आज महाराष्ट्रभर  चक्का जाम आंदोलन केले.भाजपच्या महिला आघाडीतर्फे ह्या चक्का जामची घोषणा करण्यात आली होती . या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला .त्यात भाजपचे नेतेही सहभागी झालेले दिसून आले .BJP’s Chakka Jam agitation across Maharashtra! It is time to agitate against BJP workers as the government is not serious about Pooja Chavan case

पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव सातत्याने समोर येत असून, अजून कारवाई करण्यात आलेली नाही. मृत पूजा चव्हाणच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी भाजपा महिला मोर्चा तर्फे संभाजीनगर येथे आंदोलन करण्यात आले.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप असणाऱ्या मंत्र्याने राजीनामा दिला पाहिजे! या मागणीसाठी भाजपाच्या वतीने बीड जिल्हात संजय राठोड यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला.

महिलांच्या सन्मानासाठी, मृत पूजाच्या कुटुंबांला न्याय मिळवून देण्यासाठी कोल्हापुरात भाजपा महिला मोर्चा तर्फे आंदोलन करण्यात आले.

पूजाला न्याय मिळावा म्हणून भाजपा महिला मोर्चा तर्फे परभणी येथे आंदोलन करण्यात आले.यावेळी आमदार मेघना साकोरे बोर्दिकर 

पूजा चव्हाण प्रकरणी सरकार गंभीर नाही म्हणूनचं भाजपा कार्यकर्त्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली. मृत पूजाच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, गंभीर आरोप असणाऱ्या मंत्र्याने राजीनामा द्यावा. यासाठी राज्य सरकार विरोधात घोषणा देत भाजपाने सरकारच्या कृतीचा निषेध केला

पूजा चव्हाण प्रकरणात पुरावे असूनही राज्य सरकार षंढासारखे बसलंय म्हणूनच पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी नाशिकमध्ये भाजपा महिला मोर्चा आक्रमक 

BJP’s Chakka Jam agitation across Maharashtra! It is time to agitate against BJP workers as the government is not serious about Pooja Chavan case

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*