भाजपाचा आता आत्मनिर्भर चहा, मुद्रा योजनेतून बेरोजगारांना स्टॉलचा पुरवठा

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर वाटचाल करण्याचे उद्दिष्ट असलेल्या भाजपने आता आत्मनिर्भर चहा उपक्रम सुरू केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या स्टॉलवर आत्मनिर्भर चहा पिऊन बुधवारी या उपक्रमाचे उद्घाटन केले. BJPs Atmanirbhar tea, supply of stalls to the unemployed through Mudra Yojana


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर वाटचाल करण्याचे उद्दिष्ट असलेल्या भाजपने आता आत्मनिर्भर चहा उपक्रम सुरू केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या स्टॉलवर आत्मनिर्भर चहा पिऊन बुधवारी या उपक्रमाचे उद्घाटन केले.मुंबई भाजपने आत्मनिर्भर चहा उपक्रम सुरू केला आहे. बेरोजगार तरुणांना मार्ग दाखविण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून तो राबविला जाणार आहे. केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेतून तरुणांना रोजगारासाठी सवलतीचे कर्ज उपलब्ध होते. त्याची माहिती देऊन, अर्ज भरून घेऊन आणि बँकांकडून कर्ज मिळवून देऊन चहाचे स्टॉल मुंबईत उभारले जातील.

BJPs Atmanirbhar tea, supply of stalls to the unemployed through Mudra Yojana

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेनुसार तरुणांना आत्मनिर्भर करण्यासाठी भाजपने हा उपक्रम सुरू केला आहे. सुरुवातीला किमान १०० स्टॉल सुरू होतील, असे मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. शिवसेनेने १९९५ च्या युती सरकारच्या काळात एक रुपयात झुणका-भाकर आणि नंतरच्या काळात शिव वडापाव योजना आणली. मुंबईत अनेक ठिकाणी हे स्टॉल गेल्या अनेक वर्षांत उभे राहिले आहेत. झुणका-भाकर दुर्मीळ झाली असली तरी अन्य पदार्थांचीच जोरदार विक्री सुरू आहे.
काँग्रसने कांदेपोह्यांच्या स्टॉलची घोषणा केली, मात्र पुढे फारसे काही झाले नाही

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*