भाजप आमदार प्रसाद लाड यांची २००९ मधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करणार; मुंबई पोलिसांची नोटीस

प्रसाद लाड हे त्यावेळी राष्ट्रवादीत होते. अजित पवार यांच्या जवळचे नेते होते. त्यांनी २००९ साली मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना नेत्यांच्या मागे ‘ईडी’चे शुक्लकाष्ठ लागल्यानंतर आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादीत असताना केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशीचे गंडांतर ओढवले आहे. प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. साधारण 20 दिवसांपूर्वी त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आता प्रसाद लाड यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.प्राथमिक माहितीनुसार, प्रसाद लाड यांनी २००९ साली मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी २०१४ साली त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. प्रसाद लाड हे सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते म्हणून ओळखले जातात.

कालच देवेंद्र फडणवीस यांचे आणखी एक विश्वासू सहकारी गिरीश महाजन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे.

BJP to probe MLA Prasad Lad in 2009 financial malpractice case; Notice of Mumbai Police

वर्षा राऊतांना ‘ईडी’कडून परत समन्स

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची सक्तवसुली संचलनालयाकडून पुन्हा चौकशी होणार आहे. त्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नवे समन्स पाठवले आहे. त्यानुसार वर्षा राऊत यांना ११ जानेवारील पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी ४ जानेवारीला पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास चार तास वर्षा राऊत यांना प्रश्न विचारले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*