‘भाजप स्कीमवर चालते, पण तृणमूल स्कॅमवर चालते’, पंतप्रधान मोदींचा ममतांवर हल्लाबोल

  • पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये आज सभा घेतली. या सभेतून मोदींनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला.
  • मी तुम्हाला आदिवासींच्या स्वप्नांना लाथ मारू देणार नाही. आम्ही बंगालच्या सरकारला कित्येक करोडो रुपये दिले आहेत. मात्र, अजूनही येथील बहिणी आणि मुली पाण्याच्या एका एका थेंबासाठी चिंतेत आहेत. पुढे मोदींनी नळ कुठे आहेत दिदी ? असा सवालही उपस्थित केला आहे. अनेक योजना प्रत्यक्षात का उतरल्या नाहीत. वर्षात शेतकरी केवळ एकदाच पिकं घेऊ शकतात असं का? असे अनेक सवाल मोदींनी ममता यांच्या टीएमसी सरकारला केले आहेत.

विशेष प्रतिनिधी

बांकुराः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभा घेतली. बांकुरातील प्रचारसभेतून पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारवर निशाणा साधला. भाजप स्कीमवर म्हणजेच योजनांवर चालते पण ममतांची तृणमूल काँग्रेस स्कॅमवर म्हणजे घोटाळ्यावर चालते. स्कीम कुठल्याही सरकारची किंवा लागू केलेली असूदे, पण टीएमसी मात्र स्कॅम (घोटाळा ) करण्यासाठी कोणताना कोणता मार्ग शोधूनच काढेल, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी केला.’BJP runs on scheme, but Trinamool runs on scam’, PM Modi attacks Mamata

जिथे स्कीम तिथे स्कॅम, हा टीएमसीचा मंत्र आहे. आयुषमान भारत, पीएम किसान सन्मान निधी, डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर योजनांमध्ये घोटळा करता येऊ शकत नव्हात. यामुळे या योजना पश्चिम बंगालमध्ये लागू करण्यास राज्य सरकारने नकार दिला, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचे कार्यकर्ते भिंतींवर चित्र काढत आहेत. त्यात ममतादीदी आपल्या पायाने मला लाथाडत असताना दिसत आहे. माझ्या शिरासोबत दीदी फुटबॉल खेळताना दिसताहेत. पण बंगालच्या संस्कार आणि येथील महान परंपरेचा दीदी अपमान का करत आहेत? तुम्हाला हवंच असेल तर माझ्या डोक्यावर पाय ठेवा. मला लाथाडा पण मी तुम्हाला बंगालच्या विकासाला लाथ मारू देणार नाही. बंगालच्या स्वप्नांना लाथाडू देणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

जनतेशी संबंधीत जेवढे प्रश्न करतो तेवढ्या ममतादीदी माझ्यावर चिडतात. आता माझं तोंडही त्यांना बघायचं नाहीए म्हणे. पण लोकशाहीत चेहरा नाही जनतेची सेवा आणि जनतेसाठी केलेल्या कामाची कसोटी होते. दीदी आणि त्यांच्या सरकारने १० वर्षे बंगालमध्ये काय खेळ केला? हा संपूर्ण प्रदेश त्याचा पुरावा आहे. स्वर्गीय अजित मूर्मू यांच्यासारखे अनेक आदिवासी सोबती तृणमूल काँग्रेसच्या हिंसक खेळात शहीद झाले, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला.

बांकुरा येथील पंतप्रधान मोदींच्या सभेला मिळालेला तुडुंब प्रतिसाद
(स्त्रोत :मोदींचे ट्विटर हॅण्डल)


‘BJP runs on scheme, but Trinamool runs on scam’, PM Modi attacks Mamata

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*