भाजपचा उदारमतवादी मुस्लिम चेहरा, कॉँग्रेस बंडखोर आणि भाजपमधील दुवा


भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील काही तथाकथित पुरोगाम्यांनी भाजपाला मुस्लिम विरोधाच्या रंगात रंगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जनतेने हे कधी मानले नाही आणि उदारमतवादी मुस्लिमांनी तर भाजपाला नेहमीच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जफर इस्लामसारखा उदारमतवादी चेहरा कॉँग्रेस बंडखोर आणि भाजपमधील दुवा बनला आहे.


विशेष प्रतिनिधी 

जयपूर : भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील काही तथाकथित पुरोगाम्यांनी भाजपाला मुस्लिम विरोधाच्या रंगात रंगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जनतेने हे कधी मानले नाही आणि उदारमतवादी मुस्लिमांनी तर भाजपाला नेहमीच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जफर इस्लामसारखा उदारमतवादी चेहरा कॉँग्रेस बंडखोर आणि भाजपमधील दुवा बनला आहे.

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात कॉँग्रेसचे सरकार कोसळले. यामागचे कारण ज्योतिरादित्य शिंदे यांची कमलनाथ यांच्याविषयीची नाराजी होती. परंतु,  ज्योतिरादित्य यांना भाजपात आणण्यात पक्षाचे प्रवक्ता जफर इस्लाम यांची मोठी भूमिका हो. त्यांनीच ज्योतिरादित्य आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्यात बैठका घडवून आणल्या.

राजस्थानमधील राजकारणही मध्य प्रदेशासारखेच वळण घेत आहेत. कॉँग्रेसचा तरुण चेहरा  असलेले सचिन पायलट यांना खच्ची करण्याचा प्रयत्न कॉँग्रेसमधीलच एका गटाकडून होत आहे. त्यामुळे पायलट नाराज आहेत. त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन कॉँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहूल गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, ज्योतिरात्यि शिंदे यांच्यासारखीच वागणूक त्यांना मिळाली. या दोघांनीही त्यांना भेट दिली नाही. मात्र, पायलट यांचे जवळचे मित्र असलेल्या शिंदेसोबत त्यांची बैठक झाली. जफर इस्लाम यांचे शिंदे यांच्याशी चांगले संबंध असल्याने ते पायलट यांच्या संपर्कात आहेत. राजस्थानातील सर्व राजकीय गणिताबाबत भाजपच्या हाय कंमाडला सतत अपडेट देत आहेत.

जफर इस्लाम यांचे पूर्णनाव डॉ. सय्यद जफर इस्लाम असून ते भाजपचा उदारमतवादी मुस्लिम चेहरा आहेत.  भाजपचे प्रवक्ता म्हणून जफर अत्यंत चांगले काम करत आहेत.  टीव्ही वाहिन्यांवरील चर्चेत ते दररोज भाजपची बाजू मांडतात.  राजकारणात येण्यापूर्वी त्यांचे परदेशात वास्तव्य होते. ड्यूश बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यानंी काम केले.  मात्र,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून प्रभावित होऊन जफर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  मोदींनी आपल्या राष्ट्रबांधणीच्या स्वप्नात सामील होण्याची त्यांना आॅफर दिली. जफर म्हणाले की, आता मी भाजपचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे. आता आपल्या लोकांमध्ये जाऊन पंतप्रधान मोदींच्या व्हिजन मांडतो.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती