भाजपा खासदार राम स्वरूप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू; लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या घटनेला काही दिवस लोटत नाही, तोच आणखी एका खासदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. Bjp Mp Ram Swaroop Sharma Died Allegedly By Suicide In Delhi

भाजपाचे खासदार राम स्वरूप शर्मा यांनी दिल्लीतील खासदार निवासात गळफास घेऊन स्वत:चे जीवन संपवले. त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही घटना समोर आली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.राम स्वरूप शर्मा हे भाजपाचे खासदार असून, ते हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते. दिल्लीतील आरएलएम रुग्णालयाजवळ खासदारांचे निवासस्थान आहे. याच खासदार निवासात ६२ वर्षीय शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

शर्मा यांच्या निवासस्थानातील कर्मचाऱ्यांने दिल्ली पोलिसांना ८.३० वाजता याची फोन करून माहिती दिली. शर्मा यांनी आत्महत्या केल्याचे कर्मचाऱ्याने पोलिसांना सांगितले त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यावेळी शर्मा यांचा मृतदेह लटकेल्या अवस्थेत आढळून आला. शर्मा यांनी आत्महत्या का केली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

Bjp Mp Ram Swaroop Sharma Died Allegedly By Suicide In Delhi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*