भाजप – मनसे जोडीच्या “ग्राऊंडवर्क”साठी प्रसाद लाड कृष्णकुंजवर; पण दोन्ही पक्ष जोडीने बॅटिंग करणार की एकमेकांचे “झेल” सोडून देणार?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महापालिकेच्या निवडणूक खेळपट्टीवर भाजप – मनसेची जोडी उतरविण्याचे ग्राउंडवर्क करण्यासाठी देवेंद्र फडणवीसनिष्ठ भाजप आमदार प्रसाद लाड कृष्णकुंजवर गेल्याची चर्चा रंगत असतानाच, शिवसेनेच्या पराभवासाठी काय पन… असे म्हणत खुद्द लाड यांनीच त्याला दुजोरा दिला आहे. पण दोन्ही पक्ष जोडीने बॅटिंग करणार की एकमेकांचे “झेल” सोडून देणार?, या प्रश्नाचे उत्तर मिळायचे बाकी आहे. BJP mla prasad lad visits krishna kunj, meets raj thackeray
फडणवीसांचे निकटवर्ती आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. ते जवळपास पाऊण कृष्णकुंजवर होते. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबद्दल त्यांनी काही सांगितले नाही. पण भेटीनंतर कृष्णकुंजमधून बाहेर पडल्यानंतर प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधला.


जात पैशात अडकलेलं राजकारण बदलायचं म्हणूनच मनसे, राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन


“मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावण्याचा पक्षाचा निर्धार आहे,” प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्यासोबतची भेट ही वैयक्तिक होती, अशी मखलाशी करत माझे आणि राज ठाकरे यांचे वैयक्तिक संबंध आहेत, असं लाड म्हणाले. मात्र त्याचबरोबर “शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी शक्य ते सर्व करू,”, असे सूचक विधानही त्यांनी केले.

लाड यांनी कोणत्याही राजकीय नेत्याच्या स्टाइलने ही भेट राजकीय नसल्याचे सांगितले असले, तरी येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि मनसेची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. त्यानिमित्ताने ही भेट झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण थेट युतीपेक्षा मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता व्यक्त केली जात आहे.


राज ठाकरे यांनी केले भावाचे कौतुक


मुंबई महापालिका निवडणुकीत प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढला तरी आतून ते एकमेकांशी अजडेस्टमेंट करतील. किंबहुना पक्ष पातळीवर करण्यापेक्षा ही राजकीय अडजेस्टमेंट उमेदवार पातळीवर केली जाईल, याची चर्चा आणि शक्यता अधिक वर्तविली जाते.

BJP mla prasad lad visits krishna kunj, meets raj thackeray

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती