बंगालच्या मातेसाठी भाजप महिला मोर्चाचा ‘आक्रोश ‘

विशेष प्रतिनिधी

कोलकाता: बंगालच्या माता शोवा मजूमदार यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी त्यांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निर्दयपणे मारहाण केली होती. यानंतर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यात त्यांनी आपबिती सांगितली होती.BJP Mahila Morcha’s ‘Aakrosh’ for mother of Bengal

 

त्यांना मारहाण केल्यावर धमकवण्यात देखील आले होते.
असे असूनही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही.या प्रकरणात दोषींना शिक्षा करण्याची मागणी भाजपने केली असता उलट भाजपलाच त्यांनी सुनावले .

शोवा मजूमदार यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या वतीने राज्यपालांना निवेदन देण्यात आले. तसेच आज या अमानुष घटनेच्या विरोधात कोलकाता येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

ज्यांनी मां, माटी माणूष या घोषणा दिल्या, त्यांनीच एका आईची हत्या केली. पश्चिम बंगालमध्ये महिलांवरील वाढत्या अत्याचारा विरुद्ध भाजप नेते तसेच महिला मोर्चाच्या वतीने आवाज उठवला जात आहे.

 

BJP Mahila Morcha’s ‘Aakrosh’ for mother of Bengal

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*