काँग्रेस–राष्ट्रवादी फोडण्याऐवजी भाजप–शिवसेना एकमेकांनाच फोडताहेत; नाशिकमध्ये नेत्यांची आपालल्या पक्षातच घरवापसी


  • वसंत गीते, सुनील बागूल शिवसेनेत; दिनकर पाटील वाटेवर

विशेष प्रतिनिधी

नाशिक : सगळ्या महाराष्ट्राचे राजकारण आपल्याच भोवती फिरविण्याची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची शक्ती तयार झालेली नसतानाच काँग्रेस – राष्ट्रवादीसारखे विरोधी पक्ष फोडण्याऐवजी हे दोन्ही पक्ष एकमेकांचेच नेते फोडायला लागले आहेत. नाशिकमध्ये याचे प्रत्यंतर येत आहे. bjp Leaders return home to their party in Nashik

माजी महापौर बाळासाहेब सानप यांना शिवसेनेतून फोडून देवेंद्र फडणवीसांनी भाजपमध्ये घेतले. त्याचा वचपा संजय राऊतांनी वसंत गिते आणि सुनील बागूल यांना भाजपमधून फोडून शिवसेनेत घेऊन काढत आहेत. मूळात सानप भाजपचेच होते. तिकीट कापले म्हणून ते राष्ट्रवादीत गेले. तिथून ते थोडे दिवस शिवसेनेत राहुन भाजपमध्ये परतत आहेत.पण या राजकारणाचे वर्णन माध्यमांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपला तिसरा धक्का बसल्याचे केले असले तरी प्रत्यक्षात ही नेत्यांची आपापल्या पक्षातच घरवापसी आहे. वसंत गीते, सुनील बागुल हे मूळचे शिवसैनिकच. गीतेंचा राजकीय प्रवास हा शिवसेनेतून सुरू होऊन मनसे फाट्यावरून भाजपकडे आला होता. मुलाला भाजपचा उपमहापौर करून झाल्यावर वसंत गीते शिवसेनेत परतलेत. सुनील बागुल यांचा राजकीय प्रवासही शिवसेनेतून सुरू होऊन राष्ट्रवादीच्या फाट्यावरून भाजपकडे झाला होता. ते देखील शिवसेनेत परतलेत.

दिनकर पाटलांची शिवसेना प्रवेशाची चर्चा आहे. त्यांचा प्रवास काँग्रेस – राष्ट्रवादी – भाजप आणि शिवसेना असा सर्वपक्षीय राहिला आहे. पण मूळात भाजपला धक्का – सेनाला धक्का असे जे वर्णन माध्यमे करताहेत, ते अर्धवट असून खरी गोष्ट नेते आपापल्या घरात परतलेत असाच आहे.

सुनील बागूल यांच्या पाठोपाठ भाजपचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील सुद्धा शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. दिनकर पाटील हे आपल्या 11 समर्थक नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये सत्तेत असलेले भाजप अल्पमतात जाण्याची शक्यता आहे. दिनकर पाटील यांनी सध्या भाजपच्या 4 नगरसेवकांसह प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहे.

दिनकर पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्याआधी माजी आमदार वसंत गीते आणि भाजप प्रदेशउपाध्यक्ष सुनील बागुल यांनी गुरुवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची नाशिकमधील हॉटेल एक्स्प्रेस इन येथे भेट घेतली. त्या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.

त्यानुसार आज संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास सुनिल बागुल आणि वसंत गीते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

bjp Leaders return home to their party in Nashik

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी या दोन्ही नेत्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि युवासेनेचे नेते वरूण सरदेसाई देखील उपस्थित होते. सुनिल बागुल आणि वसंत गीते दोनही नेते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची आज पुन्हा घरवापसी होणार आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती