पोलीस बदली – पोस्टिंग रॅकेट प्रकरणात मुख्यमंत्र्यांना “बोलते” करा; भाजपच्या शिष्टमंडळाची राज्यपाल भगतसिंग कोशियारींकडे मागणी

प्रतिनिधी

मुंबई  : महाराष्ट्रातल्या पोलीस बदली आणि पोस्टिंग रॅकेट प्रकरणात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलते केलं पाहिजे. या बदली रॅकेटवर राज्य सरकारने काय कारवाई केली, याचा राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागविला पाहिजे, अशी मागणी करणारे निवेदन भाजपच्या नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना राजभवनावर भेटून दिले.BJP leaders meets governer; demands action over police transfer and posting racket issue in maharashtra

राज्याला भेडसावणाऱ्या १०० हून अधिक मुद्द्यांकडे आम्ही राज्यपालांचे लक्ष वेधले, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.भाजपाचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटून महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी करणार अशा बातम्या मराठी माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. परंतु, प्रत्यक्षात भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन पोलीस बदली – पोस्टिंग रॅकेट प्रकरणासह अन्य १०० प्रकरणांमध्ये लक्ष घालायची विनंती केली.

राज्यपाल महोदयांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने केल्याची माहिती भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्याला वाचवणे गरजेचे आहे. त्यामुळेच राज्यपालांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं अशी विनंती आम्ही केल्याची माहिती मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

पवारांच्या दोन पत्रकार परिषदा, मुख्यमंत्र्यांचे मौन!!

सचिन वाझे – मनसुख हिरेन, अनिल देशमुख खंडणीखोरी, परमवीर सिंग, पोलीस बदली – पोस्टिंग रॅकेट याबद्दलचा कमिशनर इंटेलिजन्स रश्मी शुक्ला यांचा अहवाल या सगळ्या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांचे मौन ही सर्वात चिंताजनक गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांचे मौन हे घातक आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन पत्रकार परिषदा घेऊन गृहमंत्री अनिल देशमुखांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला पण तो फसला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

काँग्रेसचा वाटा किती…

फडणवीस यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल करत काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष बनल्याची टीका केली. पोलीस बदली – पोस्टिंग रॅकेटमध्ये काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावे, असा टोलाही त्यांनी लगावला. ते म्हणाले, की काँग्रेस अस्तित्वातच नसल्यासारखे चित्र आहे. दिल्लीतील नेते वेगळे बोलतायत. इथले नेते वेगळे बोलताहेत.

केवळ सत्तेसाठी हे सगळे एकत्र आहेत बाकी काही नाही. काँग्रेसला त्यांचे मित्र पक्ष किती हिस्सा किंवा वाटा देतात, असा खोचक सवाल त्यांनी केला.

BJP leaders meets governer; demands action over police transfer and posting racket issue in maharashtra

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*